मुंबई : एकेकाळी फ्रेंच राजघराण्याचा अविभाज्य घटक असणाऱ्या ले ग्राँड मार्झिन नावाच्या 19 कॅरेटच्या हिऱ्याचा लिलाव मंगळवारी जिनेव्हामध्ये करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

200 वर्षांपूर्वीचा हा हिरा फ्रान्सच्या राजाच्या मुकटात विराजमान असे.. दीड कोटी डॉलर्सची बोली लावून हिरा विकत घेण्यात आला. याच लिलावासोबत आणखी अत्यंत सुंदर अशा हिऱ्याच्या नेकलेसचाही लिलाव करण्यात आला.


संपूर्ण नेकलेस 163 कॅरेटचा असून त्यात डीकलर एम्लार्ल्ड कट हिरे वापरण्यात आले आहेत. या नेकलेसचं नाव क्रिएशन 1 असून त्यासाठी 3 कोटी 35 लाख डॉलर्स मोजण्यात आले. दरम्यान  एका रात्रीत क्रिस्टीज् या लिलाव करणाऱ्या कंपनीनं तब्बल 11 कोटी 80 लाख डॉलर्सच्या हिरे आणि त्यापासून बनवेल्या दागिन्यांचा लिलाव केला.