लास वेगास : अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लेखोर हा ६४ वर्षांचा स्थानिक वृद्ध नागरिक असल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी या हल्लेखोराला ठार केलंय. तसंच कोणत्याही दहशवादी संघटनेशी त्याचा संबंध नसल्याचं प्राथमिक चौकशीत पुढं आलंय.


लास वेगासमधल्या मांडले रिसोर्ट आणि कसिनोत म्युझिक शो दरम्यान या हल्लेखोरानं बेछूट गोळीबार केला. तब्बल १० हजार प्रेक्षक या म्युझिक कॉनर्सटला हजर होते. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


हल्लेखोराशी संबंधीत एका महिलेशी सध्या चौकशी सुरू आहे.