Silvio Berlusconi’s Will: ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन... जगजीत सिंह यांच्या या गझलमध्ये प्रेमाचा अर्थ दडला आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसत. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी (Silvio Berlusconi) आणि त्यांची त्यांच्यापेक्षा वयाने वयाने 53 वर्ष लहान असलेली त्यांची प्रेयसी मार्टा फॅसिना (Marta Fascina) यांची  प्रेमकाहानी सध्या चांगलीच चर्चेत आहे. याला कारण ठरलं आहे ते बर्लुस्कोनी  यांचे मृत्यूपत्र. सिल्व्हियो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गर्लफेंडला  900 कोटींची प्रॉपर्टी मिळाली आहे. 


बर्लुस्कोनी यांच्याकडे आहे अफाट संपत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्लुस्कोनी हे इटलीचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. ते  मीडिया टायकून म्हणून ओळखले जातात. बर्लुस्कोनी यांच्याकडे अफाट संपत्ती होती आणि त्यांची संपत्ती 6 अब्ज युरोपेक्षा जास्त असल्याचे मानले जाते. बर्लुस्कोनी हे इटलीतील एक अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अब्जाधीश, मीडिया मोगल, उद्योगपती आणि नंतर पंतप्रधान म्हणून दीर्घकाळ ते चर्चेत आहेत. 12 जून रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मिलान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


कोण आहे फासीना


33 वर्षीय फासीना 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून इटालियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य आहे. ती फोर्झा इटालिया पक्षाची सदस्य आहे. बर्लुस्कोनी यांनीच या पक्षाची स्थापना  1994 मध्ये केली होती. नव्या पक्षाच्या स्थापनेनंतर बर्लुस्कोनी यांनी पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केला.


विवाह न करता दिला संपत्तीत वाटा


मार्च 2020 पासून मार्टा फासीना बर्लुस्कोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. फासीना बर्लुस्कोनी यांच्यापेक्षा वयाने 53 वर्ष लहान आहे.  बर्लुस्कोनीने फासीनाशी कायदेशीररित्या विवाह केला नव्हता. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बर्लुस्कोनी यांनी  प्रेयसीला त्यांची 'पत्नी' म्हणून संबोधले होते. यामुळेच मृत्यूपत्रात देखील  बर्लुस्कोनी यांनी फासीने हिचे नाव करत संपत्तीत तिला वाटेकरी बनवले आहे.  बर्लुस्कोनीच्या व्यवसाय साम्राज्याची धुरा त्यांची दोन मोठी मुले मरिना आणि पियर सिल्व्हियो यांच्यावर आहे. सर्व नियंत्रणया मुलांच्याच हातात आहे. फिनइन्व्हेस्ट फॅमिलीमध्ये यांच्या 53 टक्के भागीदारी आहे. 


मृत्यूपत्रात असे केले संपत्तीचे वाटप


बर्लुस्कोनी यांनी 100 दशलक्ष युरो म्हणजेच 900 कोटी रुपये त्यांचा भाऊ पाओलोच्या नावावर केले आहेत. तर, 30 दशलक्ष युरो फोर्झा इटालिया पक्षाचे माजी सिनेटर मार्सेलो डेलउट्री यांना दिले आहेत.