लंडन : अमेरिकेत पहिल्यांदाच असं घडलंय की, लेस्बियन कपलने एकच भ्रूण दोघांच्या पोटात वाढवून बाळाला जन्म दिला आहे. शेअर्ड मदरहुड या प्रक्रियेमार्फत अमेरिकेत असं पहिल्यांदा होत आहे.  यामार्फत एक नवा इतिहास रचण्यात आला आहे. सध्या या घटनेनंतर सगळीकडे याचीच चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटिश कपल जॅस्मीन आणि डोना फ्रान्सिस-स्मिथ यांचा पहिला मुलगा ओटिसचा जन्म होऊन 2 महिने झाले आहेत. या बाळाचा जन्म वीवो नॅचरल फर्टिलायझेशन प्रक्रियेमार्फत झालं आहे. या प्रक्रियेत अंड्याला आईच्या शरीरात प्रत्यारोपण केलं गेलं. आयव्हीएफमध्ये ही प्रक्रिया शरीराबाहेर केली जाते. 


डोनाच्या शरीरात अंड्याच प्रत्यारोपण करण्यात आलं. डोनाच्या गर्भात कॅप्सुल मार्फत हे अंड सोडण्यात आलं. हे अंड जवळपास 18 तास डोनाच्या गर्भात राहिलं. त्यानंतर हे भ्रूण जास्मिनच्या गर्भात ट्रान्सफर करण्यात आलं. त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया जास्मीनच्या गर्भात करण्यात आली असून जास्मीनने या बाळाला जन्म दिला आहे. 


लंडन वुमन्स क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत फक्त दोन्ही मातांच्या गर्भाचा वापर होतो असा नाही तर त्या दोघांनाही मातृत्वाची जाणीव होते. ती भावना त्यांच्यात निर्माण होते. 


नॉटिंगशरमध्ये राहणाऱ्या डोनाने टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार, लेस्बियन कपल म्हणून या प्रेग्नेंसीकरता आम्ही खूप आनंदी आहोत. 'जास्मीन आणि मला ज्याप्रकारे लोकांच प्रोत्साहन मिळालं त्याचं आम्हाला भरपूर कौतुक आहे.' सेम सेक्स असणाऱ्या कपलच्या प्रेग्नेसीमध्ये एकच महिला गर्भधारणेचा आनंद घेऊ शकते. मात्र या प्रक्रियेत दोघींनाही तो अनुभव घेता आला आहे. 


पेशाने डेंटल नर्स असलेल्या जस्मीनने दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघीही भरपूर खूष आहेत. आमची आयवीएफ प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत.