Flight Makes Emergency Landing: अमेरिकेत एक अगदीच विचित्र प्रकार घडला आहे. साध्या डोळ्यांना पटक दिसणारही नाही एवढ्याश्या डोक्यातील उवेमुळे संपूर्ण विमानाचं इमरन्सी लॅण्डींग करण्यात आलं. लॉस एन्जलीस ते न्यू यॉर्कदरम्यानच्या विमानाला अचानक फिनॉक्स येथील विमानतळावर उतरवण्यात आलं. हा सारा 15 जून रोजीचा प्रकार असला तरी आता तो समोर आला आहे. एका प्रवाशाच्या डोक्यात उवा असल्याचं समजल्यानंतर हे आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आलं. टिकटॉकवरील प्रसिद्धी क्रिएटर इथान ज्युडेलसनने एक व्हिडीओ तयार करुन या घटनेसंदर्भात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओमध्ये इथानने विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग का करण्यात आलं याची माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही असा दावा केला आहे.


विमान उतरल्यानंतर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये इथानने, "मी इकडे तिकडे पाहिलं असता विमानतळावर विमानाने आपत्कालीन लॅण्डींग केल्यानंतर आपत्कालीन यंत्रणेमधील कोणतीही व्यक्ती तेथे नव्हती. नक्कीच हे विमान पैंज लावून उतरवण्यात आलेले नाही ना अशी शंका मला आली. विमान थांबल्यानंतर मागील बाजूस बसलेली एक महिला दरवाजाच्या बाजूला चालत गेली," असं सांगितलं. इथानने त्याला इतर प्रवाशी एकमेकांशी चर्चा करत असताना एका महिला प्रवाशाच्या डोक्यात उवा आढळून आल्याने लॅण्डींग करण्यात आल्याचं समजलं. दोन प्रवाशांनी या महिलेल्या केसांमध्ये उवा पाहिल्यानंतर एअर होस्टेसला यासंदर्भात कळवलं. त्यामुळेच अचानक हे विमान उतरवण्यात आलं. 


तब्बल 12 तासांनी पुन्हा उड्डाण


"त्या दोन मुलींनी महिलेच्या केसामध्ये उवा बाहेर येताना पाहिल्यानंतर त्यांनी फ्लाइट अटेंडट्सला सांगितलं," असं इथान आपल्या टिकटॉक व्हिडीओमध्ये म्हणाला. विशेष म्हणजे डोक्यात उवा झालेल्या या महिलेमुळे एमर्जन्सी लॅण्डींग केल्यानंतर तब्बल 12 तासांनी हे विमान न्यू यॉर्ककडे रवाना झालं. यासंदर्भात कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. विमानाने परत उड्डाण घेतलं तेव्हा प्रवाशांना त्यांच्या आधीच्याच सीट्सवर बसण्यास सांगण्यात आलं. मात्र यामुळे ज्या दोघींनी महिलेच्या डोक्यात उवा पाहिल्या होत्या त्या दोन्ही मुली आधीच्याच सीटवर बसण्यासाठी तयार नव्हत्या. कारण त्यांच्या बाजूलाच ती महिला बसली होती. 


अखेर कंपनीचं स्पष्टीकरण


अमेरिकी विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनामध्ये, "15 जुलै रोजी अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 2201 लॉस एन्जलीसवरुन न्यू यॉर्कला जात असतानाला तिला फिनिक्सला वळवण्यात आलं. एका प्रवाशाला वैद्यकीय गरज भासल्याने हा निर्णय घेतला गेला," असा खुलासा केला आहे.