Life On Earth : पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. लकरच पृथ्वीचा विनाश होईल. इतकचं नाही पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत अनेक दावे केले जातात. पृथ्वीचा विनाश हा अटक आहे. पण तुम्हाला माहित आहे आतापर्यंत पाच वेळा पृथ्वीचा विनाश झाला आहे. याला मास एक्सटिंग्शन असं म्हणतात.आता सातव्यांदा पृथ्वीवर सामूहिक विनाश अर्थात  मास एक्सटिंग्शन होणार आहे. सहाव्या वेळी पृथ्वीचा भयानक अंत होणार आहे.


हे देखील वाचा... पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण 'या' देशात सापडली; अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 260 दशलक्ष वर्षांपूर्वी म्हणजेच सुमारे 26 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीने मोठ्या विनाशाचा सामना केला आहे. हा विनाश इतका भयानक होता की  पृथ्वीवरुन जीवसृष्टी नामशेष झाली होती. अशा प्रकारे विविध भूवैज्ञानिक तसेच इतर कारणांमुळे पृथ्वीवर तब्बल सहावेळा विनाशाच्या घटना घडल्या असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.


हे देखील वाचा... पृथ्वीवरील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ! जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर इथं नक्की जा


आतापर्यंत पाच वेळा पृथ्वीवरुन जीवसृष्टी नष्ट झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पृथ्वीवर सहा वेळा सामूहिक विनाशाच्या घटना घडल्या आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या विनाशाचे पाच टप्पे सांगितले आहेत. ऑर्डोविशियन (443 दशलक्ष वर्षांपूर्वी), लेट डेव्होनियन (37 दशलक्ष वर्षांपूर्वी), पर्मियन (252 दशलक्ष वर्षांपूर्वी), ट्रायसिक (201 दशलक्ष वर्षांपूर्वी) आणि क्रेटेशियस (66 दशलक्ष वर्षांपूर्वी) असे हे टप्पे आहेत.   या काळात मोठ्या प्रमाणावर पूर आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या घटना घडल्या. पृथ्वीवर लाखो किलीमीटर दूरवर लावा पसरला यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीचा विनाश झाला. 


या पाट टप्प्यावर नजर टाकली असता सरासरी 1,000 वर्षात पृथ्वीवर विनाशाच्या घटना घडल्या आहेत. हा  कालावधी 50,000 ते 27.6 लाख वर्षांच आहे. या घटनांमध्ये पृथ्वीवर राहणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक प्राणी नामशेष झाले आहेत.
आता सहाव्यांदा पृथ्वी भयानक विनाशाच्या वाटेवर आहे. पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगचाही परिणाम होत आहेत. पार्यावर्माचा ऱ्हास होत आहे. याचा थेट परिणाम पृथ्वीवरील जीव सृष्टीवर होत आहे. अनेक प्रजाती विलुप्त होत आहेत. यामुळे लवकरच पुन्हा एकदा पृथ्वीचा अंत होणार आहे.