World Largest Gold Reserves In China: पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण चीनमध्ये सापडली आहे (World’s largest gold reserve) . चीनमध्ये सापडलेला हा सोन्याचा साठा पाहून अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला आहे. या सोन्याच्या खाणीमुळे चीनची आर्थिक क्षमता आणखी वाढणार आहे. खाणीत सापडलेल्या या सोन्याच्या किंमतीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे ही सोण्याची खाण सापडली आहे. हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोने सोन्याची खाण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील याची पुष्टी केली आहे. या सोन्याच्या खाणीची किंमत 600 अब्ज युआन म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 6 लाख 76 हजार कोटी रुपये इतकी आहे. या जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असू शकते असा दावा केला जात आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण डीप माइनमध्ये 930 पेक्षा जास्त मेट्रिक टन सोनं सापडले आहे.
चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे जमिनीखाली गोल्डन व्हेन अर्थात सोन्याच्या धारा सापडल्या आहेत. प्राथमिक शोधात 2 किलोमीटर खोलीवर 40 गोल्डन व्हेन सापडल्या आहेत. यामध्ये 300 मेट्रिक टन सोने असू शकते. हा संपूर्ण साठा एकत्र केला तर या ठिकाणी सुमारे 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाच्या खनिजाचा साठा आहे. भूगर्भातील विविध भूवैज्ञानिक प्रक्रियांमुळे सोन्याचे साठे तयार होतात. नव्याने सापडलेल्या या सोन्याच्या खाणीमुळे चीनच्या खाणकाम आणि आर्थिक क्षमतांना चालना मिळणार आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.