जकार्ता: इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता विमानळावरून उड्डाण केलेले लायन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ मॅक्स ८' हे विमान समुद्रात कोसळले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या १३ मिनिटांत या विमानचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर काही वेळातच हे विमान जकार्ता नजीकच्या समुद्रात कोसळल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक माहितीनुसार, एका बोटीतील कर्मचाऱ्यांनी हे विमान समुद्रात पडताना पाहिले. 


ही माहिती समोर आल्यानंतर इंडोनेशिया सरकारकडून तातडीने  शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जावा समुद्राच्या किनारी विमानाचे काही भाग आढळून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


विमानाची प्रवासी क्षमता १७५ जणांची होती. मात्र, अपघाताच्यावेळी विमानात नेमके किती प्रवासी होती, याची माहिती मिळालेली नाही.