डरबन : दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी आढळलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Verient) जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-19 (Covid 19) चा नवीन स्ट्रेन जगभरात झपाट्याने पसरत आहे आणि आतापर्यंत अमेरिकेसह 25 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट परिस्थिती आहे आणि ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे एका दिवसात दुप्पट झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेव्हल वन लॉकडाऊन


दक्षिण आफ्रिकेत Omicron प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता, लेव्हल वन लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत आणि लोकांना त्यांच्या घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर रस्त्यांवर शांतता दिसत आहे.


व्यवसाय पूर्णपणे ठप्प


DNA च्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेत (South Africa) एकूण 5 श्रेणीतील लॉकडाऊन लागू केले जाऊ शकतात आणि पाचव्या श्रेणीतील लॉकडाऊन सर्वात कडक मानला जातो. दक्षिण आफ्रिकेत सध्या लेव्हल वन लॉकडाऊन (Level 1 Lockdown) लागू करण्यात आला असला तरी त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.


ओमिक्रॉनचं पहिलं प्रकरण 24 नोव्हेंबर रोजी आढळलं


24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंटचं पहिले प्रकरण आढळलं होतं. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत आहे.


24 तासांत 11535 रुग्ण 


दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 11535 रुग्ण आढळले असून या कालावधीत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर यापूर्वी 2 डिसेंबर रोजी 24 तासांत 8561 नवीन रुग्णांची नोंद झाली होती आणि 28 जणांचा मृत्यू झाला होता.


दक्षिण आफ्रिकेत 47328 सक्रिय प्रकरणे


वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 29 लाख 88 हजार 148 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 89 हजार 915 जणांना या महामारीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत 28 लाख 50 हजार 905 लोक कोविड-19 मधून बरे झाले आहेत आणि 47 हजार 328 सक्रिय रुग्ण आहेत.