मुंबई : चीनच्या वुहानपासून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे युरोपमध्ये विनाश सुरु आहे. इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत. दुसरीकडे, यूके तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की लॉक़डाऊनमुळे कोरोना नियंत्रणात आला असून युरोपमधील सुमारे 59,000 लोकांचे प्राण वाचले आहेत. लॉकडाउन वेळीच झाले नसते तर मृतांची संख्या आणखी वाढली असती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपमधील 11 देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला. वृत्तसंस्था पीटीआयने एएफपीच्या हवाल्यात म्हटले आहे की, इम्पीरियल कॉलेजच्या संशोधकांना असे आढळले आहे की, कोरोना बाधित देशांमध्ये लॉकडाऊनमुळेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी झाली.


इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांनी आपला जीव गमवला. जर वेळेवर शाळा आणि कॉलेज बंद केले गेले नसते तर मृतांची संख्या आणखी वाढली असती. कोरोनामुळे इटलीत आतापर्यंत 12,428 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये 8,464, फ्रांसमध्ये 3,523 आणि ब्रिटेनमध्ये 1,789 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, "युरोपमधील 11 देशांमध्ये वेळेत लॉकडाऊन केल्यामुळे जवळपास ६० हजार लोकांचा प्राण वाचले. जर लॉकडाऊन आणखी उशिरा केले असते तर मृतांची संख्या आणखी वाढली असती.


हे पण वाचा : धोक्याची घंटा ! आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण


भारतात मात्र अजूनही लॉकडाऊनला लोकांची गांभीर्याने घेतलेलं नाही. अनके ठिकाणी लोकं गर्दी करत आहेत. अनेक जण स्वत:ला लपवत फिरत आहे. कोरोना असल्याचा संशय असताना देखील काही जण बिनधास्तपण बाहेर पडत आहेत. त्यामुळे  ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.


लॉकडाऊनमुळे कोणत्या देशात किती जणांचे प्राण वाचले


इटली - 38,000


स्पेन - 16,000


फ्रान्स - 2,500


बेल्जियम - 560


जर्मनी - 550


ब्रिटन- 370


स्वित्झर्लंड- 340


ऑस्ट्रिया - 140


स्वीडन - 82


डेन्मार्क - 69