या पंतप्रधानांनी लहान भावाच्या गर्लफ्रेंडसोबत केला विवाह
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या आपल्या कुटुंबासोबत भारत दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या आपल्या कुटुंबासोबत भारत दौऱ्यावर आहेत.
लव्हस्टोरी
पत्नी सोफी आणि आपल्या 3 मुलांसोबत पंतप्रधान जस्टिन भारतात पोहोचले आहेत. जस्टिन आणि पत्नी सोफी यांची एक इंटरेस्टींग लव्हस्टोरी आहे. यांची जोडी खूप सुंदर आहे. सोफी पीएम जस्टिन ट्रुडो यांच्या लहान भावाची गर्लफ्रेंड होती. दोघे एकाच वर्गात शिकत होते. सोबतच शाळेत जायचे.
अशी झाली भेट
एक इंटरव्यूमध्ये सोफीने म्हटलं की, 1998 मध्ये हिमस्खलन झाल्याने मायकल ट्रूंडोचा मृत्यू झाला होता. सोफी आणि ट्रूडो दोन्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. पण 2003 मध्ये दोघांची चॅरिटी शोमध्ये भेट झाली. ज्यामध्ये सोफी चॅरिटी फंक्शनची होस्ट होती. सोफीने पुढे म्हटलं की, यानंतर दोघांमध्ये इमोशनल संबंध होता.
असं केलं प्रपोज
सोफीने म्हटलं की, यानंतर मी जस्टिनला मेल केला पण यावर त्यांनी कोणतंही उत्तर नाही दिलं. 3 महिन्यानंतर दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले. यावेळी सोफीने नंबर देण्यास नकार दिला. जस्टिनने सोफीचा नंबर शोधून काढला आणि तिला डिनरला बोलावून लग्नासाठी प्रपोज केलं. दोघांनी एकमेकांना खूप वेळ डेट केलं. 2004 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. 2005 मध्ये दोघांचा विवाह केला. 2015 मध्ये जस्टिन ट्रूड कॅनडाचे पंतप्रधान झाले.