Every Family Of This Village Got 58 Lakh Rupees: एका अब्जाधीशाने आपल्या मूळ गावातील लोकांना असं सप्राइज दिलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या अब्जाधीशाने दिलेल्या अनोख्या भेटीमुळे संपूर्ण गावच मालामाल झालं आहे. येथील प्रत्येकजण लखपती झाला आहे. गाववाल्यांनी आता या उद्योगपतीचे आभार मानले आहेत. मात्र या साऱ्या घडामोडींनंतर उद्योजकाने आपल्या गावाचीच यासाठी निवड का केली याबद्दलची माहिती दिली आहे. आता ही भेट म्हणजे काय सांगायचं झाल्यास या उद्योजकाने प्रत्येक घराला 58 लाख रुपये दिले आहेत आणि ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवतात.


कुठे घडला हा प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार घडला आहे दक्षिण कोरियामध्ये. तर सगळ्या गावाला एका दिवसात लखपती करणाऱ्या या व्यक्तीचं नावं आहे ली जोंग क्यून (Lee Joong-keun)! ली जोंग क्यून हे रिअल इस्टेट कंपनी असलेल्या बोयंग ग्रुपचे (Booyoung Group) संस्थापक आहेत. ली जोंग क्यून यांनी सनचिओन शहराजवळच्या अनपयोंग-री (Unpyeong-Ri) गावातील लोकांना प्रत्येक घरटी 58 लाख रुपये भेट दिले आहेत. ली जोंग क्यून यांनी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटपही केलं आहे. 'द कोरियन हेराल्ड'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.


1500 कोटी रुपये केले दान


अनपयोंग-री गावात एकूण 280 कुटुंब राहतात. ली जोंग क्यून यांनी प्रत्येक कुटुंबाला 58 लाख रुपये दिले आहेत. ली जोंग क्यून यांनी आपल्या जुन्या वर्गमित्रांना लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. ली जोंग क्यून यांनी एकूण 1500 कोटी रुपये दान केले आहेत. ली जोंग क्यून यांच्या दानशूरपणासाठी त्यांच्यावर सध्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.


का दिले एवढे पैसे?


ली जोंग क्यून यांच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी लोकांना पैसे देण्यात आले आहेत. हे सर्वपैकी कंपनीच्या नाही तर ली जोंग क्यून यांच्या खासगी संपत्तीमधून देण्यात आले आहेत. एकेकाळी ली जोंग क्यून हे फारच गरीब होते. त्यांनी संघर्ष करुन उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास केला. गावातील अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता श्रीमंत झाल्यानंतर त्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी ली जोंग क्यून यांनी पैशांचं वाटप केलं आहे. 



दक्षिण कोरियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी


1941 साली ली जोंग क्यून यांचा जन्म झाला. 1970 साली त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आज त्यांची एकूण संपत्ती दीड लाख कोटी रुपयांच्या आशपास आहे. ते दक्षिण कोरियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबातून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. ली जोंग क्यून हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी करचोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांखाली त्यांना अटकही झाली होती.