`टायटॅनिक`च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?
Titanic First Class Dinner Menu: जगभरात अनेक अशा गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला प्रचंड कुतूहल वाटतं. अशा गोष्टींविषयी आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. टायटॅनिक हे जहाज त्यापैकीच एक....
Titanic First Class Dinner Menu: टायटॅनिक या आलिशान जहाजाला जलसमाधी मिळून शतकभराचा काळ लोटला असला तरीही त्याबाबतचे काही प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. अशाच टायटॅनिक या महाकाय जहाजाबद्दल एक कमालीची गोष्ट काही दिवसांपूर्वी जगानं पाहिली. निमित्त होतं ते म्हणजे त्या गोष्टीचा लिलाव.
टायटॅनिकवरील प्रथम श्रेणी प्रवासी अर्थात फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण बेत अर्थात Titanic First Class Dinner Menu चा लिलाव नुकताच पार पडला. अतिशय जीर्ण अशा या डिनर मेन्यूचा हा कागद, किती किमतीला विकला गेलाय माहितीये? एक अंदाज लावून या कागदाची किंमत सांगा पाहू....
एक लाख, डोक्यावरून पाणी पाच लाख? छे.... लिलावात या डिनर मेन्यूला तब्बल 83,000 pounds म्हणजेच 84 लाख रुपये मोजण्यात आले आहेत. ही किंमत पाहता एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला उपनगरांम्ये 2BHK चं घर सहज घेता येईल हाच पहिला विचार अनेकांच्या मनात आला असेल. नाही का?
मेन्यूमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा उल्लेख?
Guardian नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 11 एप्रिल 1912 ला टायटॅनिकवर रात्रीच्या वेळी ऑयस्टर, सॅमन, बीफ, स्क्वाब, डक, चिकनपासून बनवण्यात आलेले पदार्थ सर्व्ह करण्यात आले होते. त्यासोबत राईस, बटाट्यापासूनचे पदार्थ, स्प्रिंग लॅम्ब, गोडामध्ये व्हिक्टोरिया पुडिंग, जॅम, एग्स, ब्रँडी, चेरी अशा पदार्थांची रेलचेल होती. सोबत फ्रेंच आईस्क्रीम आणि अॅप्रिकॉट्सही होतेच.
टायटॅनिकच्या या मेन्यूवर अगदी वरच्या भागामध्ये स्टार लाईनचा लोगो दिसत असून त्या माध्यमातून जहाजातील प्रवाशांसाठी कोणत्या पद्धतीची मेजवानी तयार करण्यात आली होती हे पाहायला मिळालं. Henry Aldridge & Son of Wiltshire च्या वतीनं हा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात टायटॅनिकवरील डेक ब्लँकेटचाही समावेश होता.
हेसुद्धा वाचा : पर्सनल लोन घेण्याआधी बँकेला नक्की विचारा 'हे' 5 प्रश्न
डॉमिनियन येथील Len Stephenson या स्थानिक इतिहासराकाकडे असणाऱ्या एका संग्रहातून टायटॅनिकचा मेन्यू समोर आला होता. आतापर्यंत टायटॅनिकमधील अनेक गोष्टींचा, वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. 1912 मध्ये पहिल्या प्रवासाला निघालेल्या टायटॅनिकला पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली होती. प्रचंड मोठ्या हिमनगाला धडक दिल्यामुळं या जहाजानं शेकडो प्रवाशांसह समुद्राचा तळ गाठला. आजही समुद्राच्या तळाशी या जहाजाचे अवशेष असून संपूर्ण जगासाठी टायटॅनिक एक रहस्य म्हणून समोर येत असतं.