Iran Women Cut Hair : इराणमध्ये महिला वाटेल तसे केस कापतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत आहे. (Iran Women Cut Hair) काही महिलांनी अंगावरचा बुरखा काढून तो पेटवून दिला आहे. (Burn Hijab To Protest Death) इराणमध्ये बुरखा घालण्याचा कडक कायदा आहे. हिजाब प्रकरणी पोलीस कस्टडीमध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्याने तेथील वातावरण तापलं आहे. याच्याच निषेधार्थ महिलांनी डिजिटल आंदोलन सुरू केलं आहे. (Iran Protests)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्षीय इराणी तरुणी मेहसा अमिनी (MashaAmini Death police custody) हिचा शुक्रवारी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितले जात आहे. मेहसा पोलिसांच्या ताब्यात होती. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचं म्हणणं आहे की, मेहसा अमिनीला तेहरानमधून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून तिला कोठडीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. (Iran Hijab Protests)


 



 



 



इराण हा इस्लामिक देश आहे, जो शरिया कायद्याचं पालन करतो. इराणमध्ये सात वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना केस झाकूनच बाहेर जाण्याची परवानगी आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी हिजाब कायदा लागू केला होता, जो इराणमध्ये महिला आणि मुलींवर बंदी आहे. नियम कोणी मोडल्यास त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जाव लागतं.


मेहसाच्या मृत्यूनंतर तिच्या समर्थनार्थ महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा जवानांना गोळीबार करावा लागल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मेहसासच्या मृत्यूनंतर सरकारच्या निषेधार्थ असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Iran women video viral) झाले आहेत, ज्यामध्ये महिला स्वत: चे केस कापताना दिसत आहेत.  महिलांनी केस कापण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.