...जेव्हा नोबेल विजेती मलाला दिसली `जीन्स`मध्ये!
लहान मुलांच्या खासकरून मुलींच्या शिक्षणासाठी कट्टरतावाद्यांशी शांततेच्या मार्गाने दोन हात करणारी पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई नुकतीच जीन्समध्ये दिसली... मलालाचा हा फोटो थोड्याच वेळात इंटरनेटवर वायरल झाला नसता तरच नवल...
नवी दिल्ली : लहान मुलांच्या खासकरून मुलींच्या शिक्षणासाठी कट्टरतावाद्यांशी शांततेच्या मार्गाने दोन हात करणारी पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई नुकतीच जीन्समध्ये दिसली... मलालाचा हा फोटो थोड्याच वेळात इंटरनेटवर वायरल झाला नसता तरच नवल...
या फोटोमध्ये जीन्स आणि जॅकेट परिधान केलेली मलाला खूपच कॉन्फिडन्ट दिसत होती. यावेळी तीनं डोक्यावरून स्कॉर्फही लपेटलेला होता...
सोशल मीडियावर हा फोटो वायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनं मलालाच्या पोशाखामधला आणि व्यक्तीमत्वामधला हा बदल टिपला... आणि या बदलाचं स्वागतही केलं.
परंतु, काही कट्टरतावाद्यांच्या मते मात्र एका पाकिस्तानी मुलीसाठी हा पोशाख 'लाजिरवाणा' असल्याचं सोशल मीडियावर म्हटलंय.
आणि हाच विषय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला... पाकिस्तानी वेबसाइट 'Siasat.pk'नं मलालाचा हा फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलाय.
२० वर्षीय मलाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत राजकीय, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करतेय.