Man Dies During Marriage: काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. वेळीच उपचार मिळाल्याने श्रेयस यामधून बचावला आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र हल्ला हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा दैनंदिन कामाकाजादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या घटना बऱ्याचवेळा समोर आल्या आहेत. कधी जेवताना हृदयविकाराचा झटका आला तर कधी नाचताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने डान्स फ्लोअरवर पडूनच तरुणाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. सोशल मीडियावर असेच 2 व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडीओ भारतामधील आहे तर दुसरा पाकिस्तानमधील. दोन्ही व्हिडीओमध्ये बसल्या बसल्याच व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो आणि दोघांचाही प्राण जातो.


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधील घटनेचा व्हिडीओ हा सियालकोटमधील आहे. जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सियालकोटमधील दस्का तालुक्यात ही घटना घडली. या व्हिडीओमध्ये नववधू आणि वर एका सोफ्यावर बाजूबाजूला बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईकांची लहान मुलं बसल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाचा उत्साह व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. सर्वचजण हसत हसत एकमेकांशी चर्चा करत आहेत. मात्र अचानक त्यांच्या या आनंदावर विरझण पडतं. 


पोलीस तक्रार नाही


सोफ्यावर बसलेल्या नवरा मुलगा अचानक खाली पडतो. या तरुणाचा श्वास अडकतो. सुरुवातीला उपस्थितांना काही समजत नाही. नवऱ्याने मान खाली टाकल्यानंतर त्याला काहीजण धीर देऊन उचलतात. मात्र त्याची शुद्ध हरपलेली असल्याने काय झालं हे लगेच समजत नाही. मात्र श्वास बंद झाल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वजण त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करु लागतात पण त्यांना अपयश येतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांनीच नवऱ्या मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. जागीच या तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवलेली नाही असंही पोलिसांनी सांगितलं.



काही दिवसांपूर्वी भारतातही घडला असा प्रकार


मागील आठवड्यामध्येच भारतातील मध्य प्रदेशमधून इंदूरमध्ये असाच प्रकार घडला होता. या व्हिडीओमध्ये एका व्यक्ती आपल्या कुटुंबियांबरोबर रेस्तरॉरंटमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ही व्यक्ती अचानक टेबलवर ग्लानी येऊन पडल्याप्रमाणे पडते. काही क्षणांमध्ये या व्यक्तीचा जीव जातो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कैलाश पटेल असं आहे.