दुबई : सुप्रीम कोर्टाने आज तलाक संदर्भातील दिलेल्या निर्णयामुळे 'तलाक' च्या प्रथा चालवणाऱ्यांचा जोर वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या छोट्या कारणावरुन तलाक देण्याच्या घटनेत वाढ होत आहे.  सौदी अरेबियामध्ये अशी एक दुर्देवी घटना समोर आली आहे. या प्रकरणात पतीच्या पुढे चालल्याने पत्नीला 'तलाक' दिला आहे. 


रस्त्याने चालताना माझ्या पुढे जायचे नाही असे हा पती पत्नीला वारंवार बजावत असे. पण पत्नीने पतीचे म्हणणे न ऐकल्याने पतीने 'तलाक' चे पाऊल उचलले. अजूनपर्यंत या इसमाचे नाव पुढे आले नाही. स्थानिक प्रसार माध्यमांनी यासंबधीचे वृत्त दिले आहे.
असाच एक प्रकार समोर आला होता ज्यामध्ये हनीमूनला गेलेल्या पतीने पत्नीला पैजण घालू नको असे सांगितले. पण पत्नीने पैंजण घातलेच. त्यावेळी पत्नीची बोलण्याची पद्धत न आवडल्याने त्याने तलाक दिला.


'पुरूषी' मानसिकता


यामधून स्त्रियांना गुलाम म्हणून वागविण्याची पुरूषी मानसिकता प्रकर्षाने समोर येत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा योग्य निकाल लागणे अपेक्षित होते. पण न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवत सरकारच्या कोर्टमध्ये चेंडू टाकला आहे. 


'काऊंसिलिंग' ची मागणी 


सौदीमध्ये तलाकच्या वाढत्या प्रकरणांनंतर विवाहित आणि खासकरुन नवविवाहितांसाठी काऊंसिलिंग सुरु करण्याची मागणी होत आहे. या दोन वर्षात तलाकच्या प्रकरणात वाझ होत असल्याचे सौदीतील हूमदू अल शिमारी या व्यक्तीने सांगितले.