बीजिंग : चीनमधील एका व्यक्तीला झोपण्यावेळी उजव्या कानात अतिशय वेदना सुरु झाल्या. या वेदनेमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इलाजावेळी त्याच्या कानात, एक मादी झुरळ आणि झुरळाची तब्बल १०हून अधिक पिल्लं मिळाली. कानात अशा प्रकारे झुरळं निघाल्याच्या घटनेने डॉक्टरही हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेली एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, कान दुखत असल्याने २४ वर्षीय ल्वू नावाचा तरुण ग्वांगडोंग प्रांताच्या हुआंग जिल्ह्यातील स्नेह रुग्णालयात आला. रुग्णालयातील ईएनटी (कान, नाक, घसा डॉक्टर) विशेषज्ञांनी सांगितलं की, ल्वूने त्याचा कान अतिशय दुखत असल्याचं सांगितलं. त्याला कानात कोणीतरी ओरखडे मारत, कान खात असल्याचं जाणवत होतं. यामुळे त्याला अतिशय त्रास होत असल्याचं, डॉक्टरांनी सांगितलं.


ल्वूचा कान तपासल्यानंतर, मला त्याच्या कानात १०हून अधिक झुरळाची पिल्लं सापडली असल्याचं ते म्हणाले.


डॉक्टरांनी ल्वूच्या कानातून, पहिल्यांदा चिमट्याच्या साहाय्याने मोठं झुरळ बाहेर काढलं, त्यानंतर एक-एक करुन छोट्या-छोट्या आकाराची पिल्ल बाहेर काढली.


  


रुग्णालयातील ईएनटी प्रमुख ली जिन्युआन यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितलं की, ल्वूला आपल्या अंथरुणाजवळ अर्धवट जेवणाची पाकिटं ठेवण्याची सवय होती. त्यामुळे अशा पदार्थांमुळे झुरळांसारखे जीव आपल्याकडे आकर्षित होत असल्याचं त्यांनी सांगितलं.