Viral Video: `मी तुझ्यावर प्रेम करतो...` क्लबमध्ये सगळ्यांसमोर केलं प्रेम व्यक्त आणि दुसऱ्याच दिवशी...
Club Viral Video: आरोपीने मुलीला एक दिवसापूर्वी क्लबमध्ये आय लव्ह यू असे सांगून प्रपोज केले होते. या प्रप्रोजलचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
Viral News: न्यू जर्सीतील एकाने आपल्या गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर आय लव्ह यू असे सांगून जाहीरपणे प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण या प्रप्रोजलच्या दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या मंगेतराची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रप्रोजलचा एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला असून त्यानंतर तो व्हायरल झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार 52 वर्षीय जोस मेलो हा एक नोंदणीकृत लैंगिक गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या 31 वर्षीय जोडीदार निकेत जॅडिक्स त्रिनिदाद माल्डोनाडो हिला क्लबमध्ये प्रपोज केल्यानंतर एका दिवसात तिची हत्या केली.
व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हिडीओमध्ये, जोस मेलो हातात अंगठी घेऊन एका गुडघ्यावर खाली बातसो. हे बघून ज्यामुळे माल्डोनाडो आश्चर्यचकित होताना दिसून येत आहे. हे बघून तिथे उपस्थित सगळेच लोक टाळ्या वाजवता. यानंतर माल्डोनाडो मेलोच्या जवळ जाते, त्याला किस करते आणि अंगठी स्वीकारते. व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसे जोडपे एकमेकांना मिठी मारतात. व्हिडीओ संपण्यापूर्वी ते पुन्हा किस करतात.
हे ही वाचा: Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी
दुसऱ्या दिवशी मिळाली धक्कादायक माहिती
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांना एका महिलेची चाकू भोकसून हत्या केल्याची माहिती मिळाली. अखेर महिलेचा मृतदेहही मिळतो. हा मृतदेह माल्डोनाडोचा असतो. पोलिसांनी नंतर मेलोला त्याची भावी पत्नी आणि त्याच्या दोन मुलांच्या आईच्या हत्येप्रकरणी अटक केली.
हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर
पीडितेच्या मावशीची पोस्ट
पीडितेच्या मावशीने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, 30 डिसेंबर रोजी कोणत्याही कारणाशिवाय नैकीला आमच्यापासून दूर नेण्यात आले. तिने विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच्या या भयानक कृत्यामुळे तिच्या दोन मुलांना त्यांच्या पालकांशिवाय जगावे लागणार आहे. दोन मुलींची ही आई मूळची पोर्तो रिकोची आहे.
हे ही वाचा: 1 तास 40 मिनिट, एका मूक-बधिर मुलीची कथा दाखवणाऱ्या हॉरर-सस्पेन्स चित्रपटासमोर 'बदला' आणि 'दृश्यम' देखील फेल!
झाली होती आधी अटक
मेलो हा एक डीजे होता. त्याला 2010 मध्ये एका महिलेला बॉक्स कटरने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिल्याने अटक करण्यात आली होती. न्यू जर्सी स्टेट सेक्स ऑफेंडर रजिस्ट्रीनुसार, तो एक द्वितीय श्रेणीचा गुन्हेगार होता.