Viral News In Marathi: अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यक्तीने मिल्कशेक ऑर्डर केला होता मात्र मिल्कशेकच्या कपात लघुशंका असल्याचे समोर आले आहे. फॉक्स 59 नुसार, युटा येथील कालेब वुड्सने या आठवड्याच्या सुरुवातीला फुड डिलिव्हरी अॅप ग्रुबहबमधून मिल्कशेक ऑर्डर केला होता. घरी मिल्कशेकची ऑर्डर तर आली मात्र, त्याची चव पाहताच त्याच्या पायाखालची जमिनच हादरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालेब वुड्स याने म्हटलं आहे की, मिल्कशेकची डिलिव्हरी मिळाल्यानंतर मी जेवण खाण्यास सुरुवात केली. मी स्ट्रो जसा कपात टाकला आणि एक घोट प्यायला तेव्हा मला वेगळेच वाटले. मी काहितरी भलतंच प्यायले अशी मला जाणीव झाली. त्यामुळं नक्की हॉटेलने मला काय पाठवलंय हे पाहण्यासाठी मी कप उघडून पाहिला तर त्यात लघवी होती. पूर्ण कप लघवीने भरलेला होता. ग्रुबहब ड्रायव्हरने मला जो कप दिला होता तो त्यात लघवी होती. त्यामुळं मला भयंकर संताप झाला होता.


कालेब वुड्सने पुन्हा निराश होऊन डिलिव्हरी बॉयला घरी बोलवलं आणि त्याच्यासोबत वाद घालू लागला. मी ड्रायव्हरला सांगितलं की यात लघवी देण्यात आली आहे, हे तुला माहितीये का? त्यावर ड्रायव्हरने त्यांची चूक मान्य करत माफीदेखील मागितली आहे. तसंच, त्याच्याकडून इतका मोठा निष्काळजीपणा कसा घडला याचे स्पष्टीकरणदेखील दिले आहे. 


ड्रायव्हरने दावा केला आहे की, त्याच्या गाडीत दोन स्टायरोफोम कप होते त्यामुळं तो गोंधळला होता की नक्की कोणत्या कपात मिल्कशेक आहे. ड्रायव्हरने त्याची चुक कबुल करत माफीदेखील मागितली आहे. ड्रायव्हरने पुढे म्हटलं आहे की, तो खूप वेळ गाडी चालवत असतो आणि त्यामुळं त्याला  लघवीला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून तो कारमध्ये प्लास्टिकचे डिस्पोजेबल कप ठेवून स्वतःला दिलासा देतो. 


या घटनेनंतर ग्राहकाने ग्रुबहबजवळ तक्रार करत रिफंड साठी संपर्क साधला तेव्हा कंपनीने त्याच्याशी संपर्क करण्यासच चार दिवस लावले. त्याला पूर्ण रिफंडदेखील मिळाले नाही. कंपनीने ग्राहकाला $ 18रुपये देणे आवश्यक होते. त्यांनी डिलिव्हरी चार्जेस आणि मी दिलेली टिप परत केली नाही. या घटनेनंतर ग्रुबहमने या घटनेवर एक स्पष्टिकरण दिलं आहे. कंपनीने डिलिव्हरी वर्करसोबत करार रद्द केला आहे.