ओटावा : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट. प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा सध्याचा ट्रेण्ड आहे. लग्नातील प्रत्येक गोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तरीही लग्नामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्या कायमस्वरुपी आठवणीत राहतात. असाच प्रसंग कॅनडातील एका लग्नात घडला. ओटावा येथील अ‍ॅन्टारिओ पार्कमधल्या तलावाकाठी प्रि-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या क्लेटनसाठी हा दिवस असाच एका वेगळ्या कारणासाठी स्मरणात राहील. कारण शूट करता करता त्याने अचानक तलावात उडी घेतली आणि एका बुडणाऱ्या मुलाला वाचवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्लेटन कूक त्याची पत्नी ब्रिटनीसोबत लग्नाचं फोटोशूट करत होता. त्यावेळी ऑन्टारिओ पार्कमधील तलावात एक मुलगा बुडत असल्याचं त्याने पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता, क्लेटनने तात्काळ तलावात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. हॅट फोटोग्राफी फेसबुक पेजवर या संपूर्ण घटनेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. क्लेटन्स हिरोईजम, असं या फोटोंना कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.


 



लोकांनी क्लेटनने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे. आपल्या नवऱ्याच्या या कामगिरीचं क्लेटनने देखील कौतुक केलं आहे.