लंडन: छोट्या छोट्या कारणांनी आजकाल टोक्याच्या निर्णयापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. असंच एका तरुणानं आपलं आयुष्य संपवण्यासाठी सुरीनं प्रायवेट पार्ट कापण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणानं आयुष्य संपवण्यासाठी प्रायवेट पार्ट कापण्याचा निर्णय घेतला. 34 वर्षांच्या या व्यक्तीनं केलेल्या कृतीमुळे मोठी खळबळ उडाली होती. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्मिंघम इथे 34 वर्षीय व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलत सुरीने आपला प्रायवेट पार्ट कापला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला पाहताच घरच्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याची प्रकृती सध्या ठिक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा खुलासा स्थानिक ब्रिटिश मेडिकल जर्नलमधून करण्यात आला आहे. 


या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्याने स्वयंपाक घरातील सुरीचा वापर टोकाचं पाऊल उचलण्यासाठी केला होता. त्याचा मेडिकल रिपोर्ट वाचून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा प्रायवेट पार्ट जोडण्यासाठी प्रयत्न केले. 


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे चमत्काराहून कमी नव्हतं मात्र डॉक्टरांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केलं. या रुग्णाचा प्रायवेट पार्ट शरीरापासून वेगळा होऊन 24 तास उलटून गेले होते. यूनिवर्सिटी हॉस्पिटल बर्मिंगघम एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माहितीनुसार पुन्हा प्रायवेट पार्ट जर शस्त्रक्रिया करून जोडायचा असेल तर 15 तासांत ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. पण डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया मोठ्या शर्थीनं य़शस्वी केली आहे. 


डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आता या व्यक्तीची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. डॉक्टरांनी काही दिवसांच्या उपचारानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट आता पूर्णपणे बरा झाला आहे. डॉक्टर असेही म्हणतात की ही व्यक्ती आता पूर्वीप्रमाणे आपले सामान्य जीवन जगू शकते.