नवी दिल्ली : भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.


गुंतवणुकीचं क्षेत्र बनवण्याची तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तानला चीन आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बनवण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे. याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानच्या सीनेटने चीनच्या मंदारिन भाषेला मान्यता दिली आहे. न्यूज एजन्सी एनएनआयच्या मते, मंदारिनला पाकिस्तानमध्ये अधिकारिक भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.


पाकिस्तानचा धक्कादायक निर्णय


मंदारिन आणि कँटोनीज या चीनच्या भाषा आहेत. पाकिस्तानच्या कुठल्याही भागात मंदारिन भाषा बोलण्यात येत नाही मात्र, तरिही या भाषेला अधिकारिक भाषेचा दर्जा देण्यात आलाय. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


पाकिस्तानचा विचित्र निर्णय


पाकिस्तानात सध्या उर्दू, अरबी, इंग्रजी, पंजाबी, पश्तो सारख्या भाषा बोलल्या जातात. मात्र, पंजाबी आणि पश्तो सारख्या भाषांना पाकिस्तानने अद्याप अधिकारिक भाषेचा दर्जा दिलेला नाहीये.


असा आहे चीनचा प्लान


पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी सैन्याच्या देखरेखीत अनेक योजनांवर काम सुरु आहे. तसेच चीनने ६० अरब डॉलर खर्च करुन चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर बनवण्याची घोषणा केली आहे आणि हा पीओकेमधून जाणार आहे. तज्ञांच्या मते, चीनच्या या योजना भविष्यात पाकिस्तानला आपलं आर्थिक गुंतवणुकीचं क्षेत्र बनवण्याचा प्लान आहे.


'वन बेल्ट वन रोड' योजना


चीनची महत्वाकांक्षी योजना 'वन बेल्ट वन रोड' म्हणजेच एक क्षेत्र एक मार्ग (ओबीओआर) संदर्भात एका वरिष्ठ अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे. याच्या माध्यमातून भारतीय सागरी क्षेत्रात अमेरिका आणि इतर देशांचा असलेला प्रभाव संपवण्याचा चीनचा प्लान आहे. 


महत्वाचं म्हणजे भारत हा पहिला देश आहे ज्याने ओबीओआर बनवण्यावर आक्षेप घेतला होता. या योजनेचा एक भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. भारताने केलेल्या विरोधानंतर अमेरिकेसोबतच इतरही देशांनी ओबीओआरला विरोध केला होता.