Viral Video : ऑस्ट्रेलियातील जंगलात एका कांगारूने पाळीव कुत्र्याला पकडले होते. आपल्या पाळीव कुत्र्याला कांगारूच्या तावडीतून सोडवण्यासाठी मालकाने कांगारूशी दोन हात केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया हा कांगारूंचा देश म्हटला जातो. या  देशात कांगारूंची संख्या जास्त आहे. परंतु तुम्ही एखाद्या कांगारूला मानवाशी दोन हात करताना किंवा भांडतांना पाहिले  आहे का? तर हे घडलंय.
 
ऑस्ट्रेलियातील जंगलात एका मोठ्या कांगारूने एका पाळीव कुत्र्याला आपल्या काखेत घट्ट पकडून ठेवले होते. कांगारू या कुत्र्याला इजादेखील करीत होता. हे  त्याच्या मालकाच्या लक्षात आल्यावर, त्याने कांगारूच्या दिशेने धाव घेतली. 


मालकाने कांगारूला भीती दाखवत आपल्या कुत्र्याची सूटका करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचा मालक आपल्या अंगावर धावून येत असल्याचे लक्षात येताच कांगारूनेही कुत्र्याला सोडले आणि मालकाशी दोन हात करायला तयार झाला. यावेळी कांगारूदेखील मानसासारखा उभा होता. 


कांगारू आणि मालकामध्ये खुन्नस होत सुरू होती, काही कळण्याच्या आत मालकाने कांगारूच्या तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्यानंतर कांगारू गोंधळला. मालकाचे कुत्रे देखील तेथून पळून गेले. नंतर कांगारू जास्त चिडण्याच्या आत कुत्र्याच्या मालकानेही तेथून काढता पाय घेतला. 


हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. फेसबुकवर ScienceVibe या पानावर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ( व्हिडिओसाठी क्लिक करा )