Mangalyaan Farewell: भारताचं  इसत्रोची (ISRO) मंगळयान मोहीम (Mission Mangal) अखेर संपली आहे. आठ वर्ष काम करणाऱ्या मंगळयानाचा (Mangalyaan) संपर्क तुटला आहे. यासह आठ वर्ष चालणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशन (Mars Orbiter Mission - MOM) अखेर संपलं आहे. मंगळयानाचं इंधन संपलं आणि बॅटरीही डाऊन झाली यानंतर मंगळयानाचा संपर्क तुटला. भारतानं हे यानं 5 नोव्हेंबर 2013 ला लाँच केलं होतं. ते 24 सप्टेंबर 2014 ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं. त्या मिशनद्वारे भारत जगातील पहिला देश बनला होता जो थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला होता.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इसत्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळयान त्याच्या नियोजित वेळेपेक्षा 16 पटीनं चाललं. मंगळयान मोहीम फक्त सहा महिन्यांसाठी चालवण्यात येणार होती, मात्र मंगळयानानं आठ वर्ष काम केलं. मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि डेटाही पोहोचवला ज्यामुळे अंतराळातील जगाविषयी आणि मंगळाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मंगळयानाने केलेलं हे काम केलं आहे जे आजपर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळयानाने केलेलं नाही.   


भारत आणि इस्रोचे नाव


मंगळयान 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे प्रक्षेपण PSLV-C25 द्वारे करण्यात आले. मार्स ऑर्बिटर मिशन हे भारताचे पहिले इंटरप्लॅनेटरी मिशन म्हणून प्रक्षेपित करण्यात आले. या अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणानंतर, भारताची अंतर्गत अंतराळ संस्था ISRO (ISRO) ही अशी मोहीम प्रक्षेपित करणारी जगातील चौथी अंतराळ संस्था ठरली. मंगळ मोहिमेने भारताला अवकाशाच्या जगात एका नव्या उंचीवर नेले.


वाचा : Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर


मंगळ मोहिमेचे उद्दिष्ट


मंगळ मोहिमेचा उद्देश मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेणे आणि त्यातील रहस्ये जाणून घेणे हा होता. ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आणि या मोहिमेद्वारे मंगळाशी संबंधित अनेक माहिती जगासमोर आली. मंगळ मोहिमेने अवकाशाच्या जगात अनेक नवीन कारनामे केले. मार्स ऑर्बिटर मिशनने हे सिद्ध केले आहे की भारत दुसर्‍या जगात मिशन डिझाइन करू शकतो, लॉन्च करू शकतो आणि ऑपरेट करू शकतो.