Petrol-Diesel Price Today 3rd october : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price Today) आजचे, म्हणजेच 3 ऑक्टोबर 2022 चे दर जाहीर केले आहेत. आज देशात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel rate) कोणताही बदल झालेला नसून दर स्थिर आहेत.
135 दिवस देशात इंधन दर स्थिर
महाराष्ट्र आणि मेघालय सोडून राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांत 135 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर अद्याप 90 डॉलर प्रति बॅरल खाली पोहोचले आहेत. ब्रेंट क्रूड 87.94 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआई 82.06 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
तुमच्या जिल्ह्यात पेट्रोलची किंमत काय?
राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे.
देशातील महानगरांतील किमती काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
चेन्नई | 102.74 रुपये | 94.33 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
शहर आणि तेलाच्या किमती (3 ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे दर)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर