नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची कबुली खुद्द जैश....चा म्होरक्या मसूद अझहरच्या भावाने म्हणजेच मौलाना अम्मरने एका ध्वनिफितीच्या माध्यमातून दिली आहे. भारतीय वायुदलामुळे जैशचं नुकसान झाल्याचं तो या ध्वनिफितीत म्हणत असल्याची बाब आता उघड़ झाल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैश... या संघटनेच्या कोणत्या मुख्यालयावर या हल्ल्यात निशाणा साधण्यात आलेला नाही. पण, ज्या ठिकाणी जिहादची शिकवण दिली जायची अशी ठिकाणं हल्ल्यातच उध्वस्त करण्यात आल्याचं तो बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे. हल्ल्यात उध्वस्त झालेल्या ठिकाणांटची पुनर्बांधणी करुन ही प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करत या हल्ल्याचं प्रत्युक्तर देण्याविषयीचं आवाहन त्याने दहशतवद्यांना केल्याचं म्हटलं जात आहे.


मौलाना अम्मरची ही ध्वनिफित पाहता बालाकोटमध्ये दहशतवदी तळांवर भारतीय वायुदलाने केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचं कंबरडं मोडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 


काय करतो मसूद अझहरचा भाऊ?


जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेला झालेल्या नुकसानाचं रडगाणं गाणारा मसूद अझहरचा भाऊ मौलाना अम्मर हा जैशच्या जिहादी कारवायांचाच एक भाग आहे. बालाकोटमध्ये सुरू असलेल्या जिहादची फॅक्टरी अम्मारच्या देखरेखीखालीच सुरू होती. अम्मार जैशच्या विविध दहशतवादी तळांवर काश्मीरच्या नावाखाली भारताप्रती तरुणांची  माथी भडकावण्याची कामं करतो. भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २८ फेब्रुवारीला पेशावरमध्ये एका मिरवणुकीत अम्मार या हल्ल्याविषयी वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे. त्याने यावेळी भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेला हल्ला म्हणजे एका युद्धाची सुरूवात असं म्हटलं.