Ayman al Zawahiri killed : अमेरिकेने  9/11 चा पुन्हा एकदा बदला घेतला आहे. अमेरिकेने अत्याधुनिक अशा R9X hellfire Missile चा वापर करत अयमान अल जवाहिरी याचा खात्मा केला. थेट अफगाणिस्थानमध्ये आपले ड्रोन्स घुसवून अमेरिकेने अयमान अल जवाहिरी याला यमसदनी धाडलं आहे. पण नेमकं अमेरिकेला त्याबाबत कुठून आणि कशी माहिती मिळाली? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने जवाहिरीला संपवण्यासाठी कसा प्लॅन आखला? कसं हे अत्यंत कठीण मिशन फत्ते झालं? जाणून घेऊयात. (Masterplan Ayman al Zawahiri killed america)


या सवयीमुळे मारला गेला जवाहिरी
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी हा आपल्या विशेष सवयीमुळे ठार झाल्याची माहिती आता समोर येतेय. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जवाहिरी याला वारंवार आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये येण्याची सवय होती. 


आपल्या बाल्कनीमध्ये येण्याच्या याच सवयीमुळे CIA ला तो काबूलमध्येच लपला असल्याची शंका आली. यानंतर अमेरिकेने रिपर ड्रोन च्या मदतीने R9X hellfire Missile डागले आणि जवाहिरीचा खेळ संपवला.  


मिशनमध्ये खास महिलांचा समावेश
जवाहिरीला संपवण्याचा संपूर्ण प्लान हा अमेरिकेत तयार होता. यामध्ये खास महिलांच्या मदतीने अमेरिकेने हे लक्ष्य साध्य केल्याची माहिती आता समोर येतेय. जवाहिरी याच्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी अमेरिकन एजन्सीजने खास महिलांना प्रशिक्षण दिल्याची माहिती समजतेय. जवाहिरीपर्यंत अमेरिकन सैन्याचा सहज प्रवेश व्हावा यासाठी या महिलांचा उपयोग झाल्याचीही माहिती समजतेय.


जवाहिरी अफगाणिस्थानमध्ये आल्यानंतर त्याच्या घराबाहेर पडलाच नाही असं बोललं जातंय. याच जवाहिरीवर अमेरिकेकडून  25 मिलियन डॉलर्स चं बक्षीस ठेवण्यतात आलं होतं.