Mayor Crocodile Wedding: एखाद्या माणसाने मगरीशी लग्न केल्याचे कधी ऐकले आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. मेक्सिकोमध्ये हा प्रकार समोर आला असून सर्वसाधारण नागरिक नव्हे तर एका महापौरानेच मगरीशी लग्न केले आहे. महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा असे त्यांचे नाव आहे. लग्नावेळी मगरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. लग्न का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. त्यामागचं कारण ऐकून तुम्ही नक्कीच डोके धराल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांचा मगरीसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. मगरीसोबत लग्न करण्यामागचं कारणही खूप रंजक आहे. चांगले पीक यावे आणि शहरात शांततेचे वातावरण राहावे, यासाठी व्हिक्टर ह्यूगो यांनी हे लग्न केले आहे. 


मगरीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 


कापणी आणि समृद्धी आणण्यासाठी मगरी आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांशी लग्नविधी करतात, अशी स्थानिक समजूत आहे. त्यामुळे या अनोख्या लग्नाला अनेकांनी हजेरी लावली होती. लग्नात वधू-वरांच्या सर्व परंपरांचेही पालन करण्यात आले. त्यामुळेच मगरीसोबतच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


मगरीच्या प्रेमात असल्याची महापौरांकडून कबुली 


'मी मगरीची जबाबदारी स्वीकारतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तेच महत्वाचे आहे. प्रेमाशिवाय तुम्ही लग्न करू शकत नाही. मी राजकुमारी मुलीशी लग्न करण्यास तयार आहे, असे लग्नादरम्यान महापौरांनी सांगितले.


गावात 230 वर्षांपासून अशा लग्नाची परंपरा


या गावात 230 वर्षांपासून पुरुष आणि मादी मगरीचे लग्न होत आहे. दोन स्वदेशी गटांनी विवाहासह शांतता घोषित केल्याचा हा दिवस मानला जातो. चोंटल राजाने हुआवे देशी समुहाच्या राजकुमारी मुलीशी लग्न केले. ज्याचे प्रतिनिधित्व आता मादी मगर करत असल्याची लोककथा सांगितले जाते.