मुंबई : अमेरिकेत कोरोना विषाणू दाखल होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. कोरोना विषाणू आता संपूर्ण अमेरिकेत पसरला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण प्रकरणे 2 लाखांच्या वर गेली आहेत आणि 4000 लोकांचा बळी गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीतही अमेरिकेने चीन आणि इटलीला मागे टाकले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अमेरिकेत कोरोना विषाणूचे भयंकर रूप अद्याप समोर आले नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही येणारे दोन आठवडे कठीण असल्याचे म्हटले आहे. व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांना भीती आहे की अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 1 ते 2 लाख लोकांचा म-त्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता हा प्रश्न उपस्थित होतोय की अमेरिकेचं कुठे चुकलं?


अमेरिकेत वैद्यकीय साहित्य, मास्क, गल्बस, गाऊन आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता आहे. रुग्णालयामध्ये आणि डॉक्टरांकडे संसर्गापासून बचाव करण्यासाठी पुरेशी उपकरणे नाहीत. बर्‍याच आरोग्य कर्मचाऱ्यांना सेनेटरी वस्तूंचा पुन्हा वापर करण्यास भाग पाडले जाते आहे. तर काही त्यांच्या स्तरावर मास्क बनवत आहेत. सर्वात मोठी चिंता म्हणजे व्हेंटिलेटरचा अभाव. मंगळवारी न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुमो यांनी याबाबत तक्रार केली. ते म्हणाले, प्रथम वैद्यकीय उपकरणे मिळविण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांमध्ये एक स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे त्यांचे दर वाढले आहेत. कुमो म्हणाले, ईबेवर व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी राज्यांनी जशा रांगा लावल्या आहेत.


अधिक वाचाकोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट


जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आरोग्य धोरण आणि व्यवस्थापनाचे प्राध्यापक जेफ्री लेवी यांनी, बीबीसीला सांगितले की अशी परिस्थिती घडू नये. अमेरिकन सरकारला वेळेवर पर्याप्त वैद्यकीय उपकरणे पुरवता आली नाहीत. कोरोना संकट वाढले तरीसुद्धा सरकारने अत्यंत सावकाश काम केले आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढविण्यात आठवडे गमावले. उत्पादन वाढविण्यातही सरकारने पूर्ण क्षमतेचा उपयोग केला नाही.


प्राध्यापक लेवी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशांप्रमाणेच कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अधिक चाचणी घेणे ही प्रतिबंधकांची सर्वात प्रभावी पद्धत आहे. असे करण्यात अयशस्वी होणे ही अमेरिकन सरकारची सर्वात मोठी चूक होती. यामुळे अमेरिकेत भीषण कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाला.


अधिक वाचा: कोरोनाबाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा, पुरुषांनो सावधान !


'कोणत्याही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की, नेमकं काय सुरु आहे. ही माहिती नसल्यास, आपण अंधारात बाण सोडतो आहे. व्हायरसचा पुढील हॉटस्पॉट कोठे असेल हे आपल्याला माहिती नाही. आपण शक्य तितक्या चाचणी केल्या पाहिजेत. कारण संक्रमित रूग्णांची ओळख पटली की त्यांना उर्वरित लोकांपासून विभक्त करता येते. ज्यामुळे संसर्ग कमी प्रमाणात पसरतो आणि आपण संपूर्ण देशात लॉकडाउन टाळू शकतो.'


मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने आश्वासन दिले की, ते महिन्याच्या अखेरीस 50 लाख चाचण्या घेतील. तथापि, एका विश्लेषणानुसार 30 मार्चपर्यंत केवळ 10 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही संख्या इतर देशांपेक्षा जास्त आहे परंतु अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे. दुसरीकडे, चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागत असल्याने लोकांना हे कळत नाही आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही.'


अधिक वाचा : लॉकडाऊनमुळेच वाचले हे ११ देश, भारतात पालन होणं गरजेचं
 


ट्रम्प आणि इतर नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य गंभीर समस्या असल्याचे दर्शवत आहे. प्रोफेसर लेवी म्हणतात, 'कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात सतत गोष्टी बदलतात आणि त्यानुसार आपले वक्तव्य ही बदलतात. परंतु या प्रकरणात विधाने कोणत्याही वैज्ञानिक संकेत किंवा ग्राऊंड रिपोर्टच्या आधारावर नव्हे तर राजकीय चिंतेमुळे बदलली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कठीण काळातही डेमोक्रॅटिक राज्यपालांशी लढत आहेत.'


सामाजिक अंतर योग्यरित्या अंमलात आणले जात नाही, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर खूप महत्वाचे आहे. परंतु सर्व सूचना देऊनही विद्यार्थ्यांची गर्दी अमेरिकेच्या फ्लोरिडा बीच येथे दिसत आहे. हजारो लोक लुझियाना येथील चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी आले होते. चर्चचे फादर  टोनी स्पेलला म्हणतात की "आमचा विश्वास आहे की व्हायरस राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे." आमचे सर्व धार्मिक हक्क सुरक्षित आहेत आणि जरी काहीही झालं तरी आम्ही प्रार्थनेसाठी जमणे थांबवणार नाही.'


देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत जी दर्शविते की सामाजिक अंतराच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बरीच स्थानिक सरकारे आणि राज्य सरकारे व्यवसाय बंद करण्यास आणि लोकांना त्यांच्या घरात बंदिस्त ठेवण्यास तयार नाहीत. फ्लोरिडा बीचवर एका मुलीने असं देखील सांगितलं की, मला जरी कोरोना झाला तरी चालेल पण मला पार्टी करण्यापासून कोणी रोखू शकणार आहे.'


या अशा सर्व परिस्थितीमुळे अमेरिका येणाऱ्या काळात मोठ्य़ा संकटात सापडण्याची शक्यता आहे.