कोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट

जिओच्या ग्राहकांना मोठा दिलासा

Updated: Apr 1, 2020, 02:59 PM IST
कोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट

मुंबई : रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना कोरोनाचं सावट असताना मोठा दिलासा दिला आहे. JioPhone यूजर्सला १७ एप्रिलपर्यंत १०० मिनिटं वॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री देण्याची घोषणा केली आहे. सोबतच जिओफोन यूजर्सची वॅलिडिटी संपली तरी देखील इनकमिंग कॉल्स सुरु राहणार आहेत.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिओने आपल्या ग्राहकांना हा मोठा दिलासा दिला आहे. याआधी एअरटेल, वोडाफोन-आइडिया आणि बीएसएनएलने देखील प्रीपेड ग्राहकांना अकाउंट वॅलिडिटी आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे.

जिओफोन यूजर्सला १०० मिनिटं कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री दिले जाणार आहे. यूजर्स १७ एप्रिलपर्यंत देशभरात कॉलिंग आणि मॅसेज करु शकतात. जिओफोन यूजर्सला वॅलिडिटी संपल्यानंतर ही इनकमिंग कॉल्स सुरु राहणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या चिंतेचं वातावरण असताना देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

पोस्टपेड ग्राहकांना गूगल पे, फोन पे आणि पेटीएमच्या माध्यमातून ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा सुरु असणार आहे. याशिवाय Axis आणि ICICI बँकेच्या कॉल आणि एसएमएस सर्व्हिसने देखील रिचार्ज करु शकता.