वॉशिंग्टन :Meta Share tanks: फेसबुकने स्वतःला मेटा बनवणे मार्क झुकरबर्गसाठी फायदेशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात मेटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक निराशाजनक राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचे शेअर्स गुरुवारी 25 टक्क्यांच्या घसरणीसह उघडले आणि सोशल मीडिया नेटवर्किंगमधील या दिग्गज कंपनीचे सुमारे 230 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.


मार्क झुकेरबर्गलाही यांनादेखील या नुकसानीचा फटका सहन करावा लागला असून त्यांच्या एकूण मालमत्तेत 23.34 टक्क्यांची घट झाली आहे फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत झुकेरबर्ग $87.7 अब्जसह 12व्या स्थानावर घसरले आहेत.


नुकसानाचे कारण 


मेटाने सांगितले की, आमच्या महसूलात घट होईल असा आमचा अंदाज होताच. कारण वापरकर्त्यांच कंपनीच्या सेवा वापरण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. महागाईमुळे कंपनीचे जाहिरातदार जास्त खर्चासाठी अनुकूल नाहीत. ऍपलच्या जाहिरात ट्रॅकिंग बदलांमुळेदेखील कंपनीला नुकसान होणार आहे.


दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांमध्ये घट


मेटाने एका तिमाहीत प्रथमच दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांमध्ये घट नोंदवली आहे. मेटाचे रोजचे सक्रिय वापरकर्ते 193 कोटींवरून 192.9 कोटींवर आले आहेत. कंपनीने जागतिक स्तरावर सुमारे एक दशलक्ष वापरकर्ते गमावले आहेत. 


यूएस आणि कॅनडामध्ये कंपनीच्या प्रगतीची स्थिती स्थिर आहेत, ज्या कंपनीच्या सर्वात फायद्याच्या बाजारपेठा आहेत.


कंपनीने OTT प्लॅटफॉर्मलाही जबाबदार 


या निराशाजनक निकालासाठी नेटफ्लिक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्मही जबाबदार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मेटाला गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत 10.3 बिलियन डॉलर नफा झाला होता. असे असूनही दैनंदिन वापरकर्त्यांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. ऑक्टोबरच्या अखेरीस कंपनीने आपले नाव बदलून मेटाव्हर्स केल्यानंतर हा पहिलाच परिणाम आहे.


भारतातील डेटाच्या किमती वाढण्याचे कारण


2021 च्या शेवटच्या 2 तिमाहीत फेसबुक अ‍ॅपने जवळपास  10 लाख दररोजचे यूजर्स गमावले. तथापि, अ‍ॅपचे अद्याप 2 अब्ज दररोज वापरकर्ते आहेत. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) डेव्हिड वेनर म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमुळे जगभरातील यूजर्स कमी झाले आहेत.


यामध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कोरोना महामारी आणि भारतातील मोबाइल डेटाच्या किमतीत झालेली वाढ यांचा समावेश आहे. या कारणांमुळे स्पर्धा सेवांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे विशेषत: तरुणांचा वापर कमी झाला आहे.


वर्चुअल रियल्टी मोठी गुंतवणूक


झुकरबर्ग व्हीआर हेडसेट, एआर चष्मा आणि मेटाव्हर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेटासाठी आभासी तंत्रज्ञानावर मोठी गुंतवणूक करीत आहेत. पण झुकेरबर्गने आपल्या गुंतवणूकदारांच्या एका कॉलमध्ये कबूल केले की आमची दिशा स्पष्ट आहे, परंतु पुढे जाण्याचा मार्ग पूर्णपणे स्पष्ट नाही.


Meta ला पहिल्या तिमाहीत $27 अब्ज ते $29 बिलियन इतका नफा अपेक्षित आहे.