गाडीवर हेलिकॉप्टर कोसळणार एवढ्यात.... पाहा क्रॅश लॅण्डिंगचा थरारक व्हिडीओ
असं खतरनाक क्रॅश लॅण्डिंग तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलं नसेल, व्हिडीओ
मेक्सिको: नुकताच मिग 21 क्रॅश झाल्याची घटना ताजी आहे. तर चिनूक हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लॅण्डिंग करण्यात आलं होतं. आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्याचं खतरनाक लॅण्डिग झालं आहे. यापूर्वी तुम्ही असं क्रॅश लॅण्डिंग कधीही पाहिलं नसेल.
हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचं स्वप्न कुणाचं नसतं मात्र काही असे व्हिडीओ पाहिले की धडकी भरते. हेलिकॉप्टर पाहायला अनेकांना आवडतं. मात्र याच हेलिकॉप्टरमुळे अनेकांचा जीव धोक्यात गेल्याची घटना समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने क्रॅश लॅण्डिंग झालं. हे हेलिकॉप्टर लॅण्ड होत असतातना गाडीवर कोसळता कोसळता राहिलं मात्र त्याचा धक्का गाडीला लागला.
या हेलिकॉप्टरच्या वरचे पंखे सगळे तुटून आजूबाजूला उडाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेचा व्हिडीओ रॉयटर्स या संस्थेनं ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हेलिकॉप्टरमधील चालकाचं नियंत्रण बिघडल्याने हेलिकॉप्टर हेलकावे खात खाली लॅण्ड होत आहे. याच दरम्यान ते एका गाडीवर कोसळताना वाचलं मात्र क्रॅश लॅण्डिंगचा हा व्हिडीओ फार भीषण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिको नौदलाचं हे हेलिकॉप्टर आहे. बचावकार्यासाठी जात असताना हेलिकॉप्टरसोबत ही दुर्घटना घडली आहे. या दरम्यान जीवितहानी झाल्याची माहिती सध्या तरी मिळाली नाही. मात्र काही लोकं जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.