Bill Gates linkedin Post Viral: मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. जागतिक श्रीमंताच्या यादीत बिल गेट्स यांचा सहावा क्रमांक लागतो. तंत्रज्ञान आणि समजाप्रती असलेलं प्रेम कोणीही नाकारू शकत नाही. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या (Bill And Melind Gates Foundation) कार्यावर लक्ष केंद्रित करण्याासाटी गेट्स यांनी 2000 या वर्षी कंपनीचे सीईओ पद सोडले होते. असं असताना बिल गेट्स यांची  लिंक्डइनवरील पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये गेट्स यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये गटाराचं पाणी प्यायलाचा सांगितलं आहे. त्याचबरोबर टॉयलेटमधील घाण वास घेतल्याचंही सांगितलं आहे. "मी मागच्या काही वर्षात विश्वास न पटणारी काम केली आहेत. मी अमेरिकन कॉमेडियन जिमी फॉलॉनसोबत गटाराचं पाणी प्यायलो आहे. त्यासोबत टॉयलेटमधला घाण वासही घेतला आहे. इतकंच काय तर काचेच्या जारमध्ये मानवी विष्ठा मंचावर सादर केली आहे. वाचताना तुम्हाला विचित्र वाटेल पण हे सर्व काही चांगल्या कामासाठी केलं आहे." बिल गेट्स यांची पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. 


वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सचं आभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिल गेट्स यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जगभरातील वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सच आभार मानतो. आजार रोखण्याच्या जवळ आहेत." बिल गेट्स यांनी आपल्या पोस्टमध्ये नोव्हेंबर 2018 च्या पोस्टचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये विकसनशील देशातील शौचालयाच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी ते मंचावर एका काचेच्या पॉटमध्ये मानवी विष्ठा घेऊन पोहोचले होते. जगातील 3.6 बिलियन लोकांकडे शौचालय नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  


"विना शौचालय असणं त्रासदायक आहे. अस्वच्छता म्हणजे दूषित पाणी, माती आणि जेवण. यामुळे आजार आणि मृत्यू होऊ शकतो. ताज्या आकडेवारीनुसार, डायरिया आणि स्वच्छता संबंधित आजारामुळे दर वर्षी पाच लाखांहून अधिक पाच वर्षांपेक्षा लहान बालकांचा मृत्यू होतो", असंही त्यांनी पुढे सांगितलं. 



बातमी वाचा- Video: विमानाच्या कॉकपिटमधील खिडकीतून बाहेर डोकावला पायलट, कारण वाचाल तर डोक्यावर हात माराल


जगभरातील समस्यांवर टाकला प्रकाश


बिल गेट्स यांनी केलेल्या पोस्टमध्ये जुलै 2021 ची लिंक देखील आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत स्वच्छतेचे नवे मार्ग शोधण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशननं दहा वर्षापूर्वी टॉयलेट्स पुन्हा बनवण्याचं आव्हान दिलं होतं. बिल गेट्स यांनी सप्टेंबरमध्ये सॅमसंगसोबत एकत्र येत विना पाणी घरगुती टॉयलेट प्रोटोटाइप तयार केला आहे.