मुंबई : 'मिस युनिव्हर्स 2021' स्पर्धा जिंकणाऱ्या हरनाज संधूची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. लोकं तिच्याबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचं सोशल मीडिया अकाउंट शोधत आहेत. दरम्यान, हरनाज संधूने अलीकडेच अशाच एका फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये हरनाजने ब्रा आणि टॉपशिवाय कोटने अंग झाकलेलं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाजने मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये हरनाजने मिस युनिव्हर्सचा मुकुट डोक्यावर घातलेला दिसत आहे. यासोबत हरनाजने गुलाबी रंगाचा कोट परिधान केला आहे. या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की, मिस युनिव्हर्सने ना ब्रा घातली होती ना कोटच्या आत टॉप. त्यामुळे मिस युनिव्हर्सचे हे फोटो चर्चेत आहेत.


हरनाज संधूच्या सौंदर्याने अवघं जग वेडं झालं आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हरनाज खूपच सुंदर दिसत आहे. ज्यावरुन आपले डोळे काढणं कठीण होऊ शकतं. फोटोमध्ये हरनाज हलक्या मेकअपसह मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे.



फोटोला सुंदर कॅप्शन 
या फोटोशूटमधील एक फोटो शेअर करत हरनाज संधूने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'संपूर्ण विश्व तुमच्यात आहे!'