मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अनेक लोक तर प्रसिद्धीसाठी आणि फॉलोअर्ससाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. तर अनेक महिला या आपलं शरीर दाखवून लोकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकूण तुम्हाला देखील धक्का बसेल. एक मॉडेल दोन अल्पवयीन मुलांसमोर पूल पार्टीदरम्यान टॉपलेस झाली. विशेष म्हणजे यादरम्यान ती सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीम करत होती. ज्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण अमेरिकेतील जॉर्जिया येथील लाग्रेंज येथील आहे. 30 वर्षीय कायली स्ट्रिकलँड टॉपलेस झाल्याचे पाहून एका दर्शकाने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.


काइली तिच्या टिकटॉक पेजवरून लाईव्ह स्ट्रीम करत होती. येथे तिला 2 लाख 60 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. लाइव्हमध्ये ती एक महिला आणि दोन मुलांसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.


लाईव्ह स्ट्रीम दरम्यान दोन्ही मुलं कॅमेराकडेच बघत होती. यादरम्यान कायलीने बिकिनी उतरवल्याचा दावा केला जात आहे. ज्यानंतर आता तिच्यावर इलेक्ट्रिक पोर्नोग्राफी आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कायलीने तिचे सर्व सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट केले आहेत.


काइलीने नंतर एक व्हिडीओ अपलोड करून स्वतःचा बचाव केला. पूल पार्टीला पोहोचण्यापूर्वीच या दोन्ही मुलांनी टकीलाचे शॉट्स प्याले होते, काइली म्हणाली- इतरांच्या मुलांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी नाही, त्यांचे पालक त्यावेळी तिथे उपस्थित होते.


परंतु पाईक काउंटी शेरिफच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले - काइलीने उत्तेजकपणे तिची छाती अल्पवयीन मुलांना विशेष हेतूने दाखवली. त्यानंतर ती सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती.