वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन आणि पाकिस्तानसह सा-या जगाची या भेटीकडे नजर लागली होती. व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दहशतवाद या प्रमुख मुद्यावर एकमत झालं. दोन्ही देश एकत्र येउन दहशतवाद संपवू असं यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून, दोन्ही देश मिळून आयसिसला संपवण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.


या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद या प्रमुख विषयावर चर्चा केली. तसेच मोदींनी द्विपक्षीय संबंध, अफगाणिस्तानातील अस्थिरता, प्रादेशिक, आर्थिक अशा अनेक विषयांवर चर्चा केली. नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहपरिवार भारतात येण्याच निमंत्रणही दिले. त्यामुळे या भेटीचा आता दोन्ही देशांना फायदा होणार आहे. तसेच द्विपक्षीय सुधारण्यास मदतही होणार आहे.