फ्रान्समध्ये आढळलं प्रसिद्ध `मोनालिसाचं न्यूड स्केच`
इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं `मोनालिसा`चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय.
नवी दिल्ली : इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं 'मोनालिसा'चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय.
बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये एका संग्रहालयात दीडशे वर्षांहून जुनी एक कलाकृती आढळलीय. चारकोलच्या साहाय्यानं बनवण्यात आलेली ही कलाकृती म्हणजे 'मोनालिसाचं न्यूड स्केच' असल्याचं म्हटलं जातंय.
फ्रान्सच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चारकोलमध्ये एक निर्वस्त्र महिला दिसतेय... या कलाकृतीला 'मोना वाना' म्हटलं जातंय. यापूर्वी या कलाकृतीचं श्रेय केवळ लिओनार्डो दा विंची स्टुडिओलाच दिलं जातं होतं.
पॅरीसच्या ल्यूर संग्रहालयात परिक्षणानंतर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे रेखाचित्र लिओनार्डोचाच एक भाग आहे.