जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 50 लाखांच्या वर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच
मुंबई : जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जगात कोरोनाने 50 लाख 38 लोकांना संक्रमित केलं आहे. ज्यामध्ये 3 लाख 28 हजार 172 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. आतापर्यंत येथे 15.5 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5609 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून रोज 5 हजाराहून अधिक रुग्ण वाढू लागले आहेत. देशात सध्या 63 हजार 624 जणांवर उपचार सुरु आहेत.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 12 हजारांवर पोहोचली आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 1 लाख 12 हजार 359 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी 3435 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 45 हजार 299 लोकं बरे झाले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात नंतर तामिळनाडूमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 39 हजार 297 रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत येथे 2250 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गुजरातमध्ये एकूण 12,539 रुग्ण आहेत. 24 तासात येथे 398 रुग्ण वाढले आहेत. तामिळनाडूमध्ये आता गुजरात पेक्षा अधिक 13191 रुग्ण आहेत. 24 तासांत 743 नवीन रुग्ण येथे वाढले आहेत.