Trending Viral News : आज जग हे हायटेक झाले आहे. हातातील मोबाईल कॅमेऱ्यापासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत. या कॅमेऱ्यामुळे लोक आपलं खाजगी आयुष्य सोशल करताना दिसतं आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्ममुळे आज असंख्य नेटकरी आपल्या जीवनातील खाजगी क्षण तिथे शेअर करतात. (mother in law see intimate couple in spy cam and Video sent by a neighbor trending viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे हॉटेल रूम, मॉल चेंजिंग रूम किंवा वॉशरूममध्ये छुपे कॅमेऱ्यांमुळे जगातील अनेकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. यामधील छुपे कॅमेऱ्याचा वापर करुन लोकांना ब्लॅकमेल करण्यात येतं. पण तुम्ही घरात जर आपण सुरक्षित नसेल तर...


हो अशीच एक धक्कादायक आणि विचित्र कृत्य समोर आलं आहे. या हायटेक जमान्यात या महिलेने संतापजनक कृत्य केलं आहे. या महिलेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आपल्या मुलगी आणि सुनेचं खाजगी क्षणच पाहिले नाहीत तर ते शेजाऱ्यांसोबत तिने हा व्हिडीओ शेअरही केला आहे. 


संतापजनक कृत्य 


तैवानचे पत्रकार झू ​​शेंगमेई यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ही भयानक स्टोरी शेअर केलीय. हायपच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर हे जोडपे मुलाच्या बहिणी आणि आई वडिलांसोबत राहत होते. पण एका क्षणात या सुखी कुटुंबाचे चित्रच बदलले. त्या घरातील सून एकदा शेजाऱ्यांशी बोलत होती, त्यावेळी बोलता बोलता ती म्हणाली की, तुझी नंनद म्हणत होती की, माझी वहिनी कपड्यांशिवाय किती कुरूप दिसतंय. त्यानंतर त्या शेजारच्यांनी सूनेला जे काही सांगितले त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 


'आम्ही तुमचा व्हिडीओ पाहिला'


महिलेने शेजाऱ्याला हे सर्व कसं कळलं असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडीओ पाहिले आहेत. हे ऐकल्यावर महिला संतापली आणि थेट नंनदेला गाठलं. तिने नंनदेला या सगळ्याबद्दल जाब विचारला. त्यावर ती म्हणाली की, तुमच्या खोलीत सीसीटीव्ही आहे आणि आई रोज तुमचे खाजगी क्षण पाहत असते. 


हा सर्व प्रकार पाहून हैराण झालेल्या महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितल्यावर तोही निशब्द झाला. या सगळ्यानंतर त्याने आईला विचारलं की तू असं का केलं? पण आईने दिलेल्या अजब उत्तरामुळे तर ते अवाक् झाले. सासू म्हणाली की, 'मला थोडी तुमची रगिरी करायची होती? तुम्हाला नुकतंच एक बाळ झालंय आणि तुम्ही त्याची योग्य काळजी घेत आहात की नाही याची मला काळजी वाटत होती. 


याबाबत कुटुंबात बराच वाद झाल्यानंतर सासूचा कारनामाबद्दल कधीही माफ करणार नाही, असं राग व्यक्त त्यांनी घर सोडलं आणि तिथून कायमचे निघून गेले.