Mount Kailash: जगात अनेक अशी आश्चर्य आहेत ज्याची रहस्य आपल्याला थक्क करतात. यातलंच एक नाव म्हणजे कैलास पर्वताचं. या पर्वताविषयी खूप काही लिहिलं, बोललं गेलं. अनेकांनी आपआपले सिद्धांत मांडत या पर्वताबाबत दावेही केले. पण, त्याबाबतचं नेमकं सत्य पावलोपावली चकवा देतच राहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माऊंट एव्हरेस्ट या उत्तुंग शिखरापेक्षा कमी उंची असूनही कैलाश पर्वत कोणालाच सर करता आलेलं नाही. तसं पाहिलं, तर एव्हरेस्चची उंची  8,849 मीटर आणि कैलाश पर्वताची उंची 6,638 मीटर. मुख्य म्हणजे हा पर्वत इतका रहस्यमयी आहे, की त्यापुढं रशिया आणि चीननंही माघार घेतली आहे. असं म्हणतात, की कैलास पर्वतशिखरावर देवादिदेव महादेवाचा वावर आहे. तिथं ते आपल्या गणांसमवेत राहतात. ज्यामुळं ते कधीच इथं येण्याची परवानगी कोणालाही देत नाहीत. एकिकडे ही धारणा असतानाच दुसरीकडे या पर्वताबाबतची अनेक शास्त्रीय कारणं आणि संशोधनंसुद्धा समोर आली आहेत. 


कैलासची चढाई इतकी कठिण? 


असं म्हणतात की एव्हरेस्टच्या तुलनेत कैलास पर्वताची चढाई अतिशय कठिण आहे. किंबहुना या पर्वतावर चढाई करण्यासाठी कोणती वाटही नाही. इथं जागोजागी लहानमोठे डोंगरच आहेत. काहींच्या मते हा पर्वत सर करण्यासाठी येणाऱ्यांचं लगेचच हृदयपरिवर्तन होतं आणि ते आल्या पावली मागे फिरतात. जी मंडळी हे सारं होऊनही पर्वतावर चढाई करण्यासाठी पुढे जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर लगेचच म्हातारपण दिसू लागतं.


चीन, रशियानंही हात टेकले... 


चीन सरकारच्या आदेशानंतर काही गिर्यारोहकांनी कैलास सर करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली होती. पण, त्यांच्या वाट्याला अपयशच आलं. त्यामुळं चीननंही या रहस्यमयी पर्वतापुढं हात टेकले. रशियानं 1999 मध्येही या पर्वतावर संबंधित एक अहवाल सादर केला होता. जिथं हे पर्वत नैसर्गिक नसल्याचा दावा त्यांनी केला होता. 


हेसुद्धा वाचा : Interesting! शिक्षक उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल शाईचा पेनच का वापरतात? 


 


असं म्हणतात की कैलाश पर्वतावर रेडिओअॅक्टीव्ह लहरी जास्त प्रमाणात आहेत. ज्यामुळं इथं चढाईसाठी येणारे व्यक्ती कालांतरानं दिशाहीन होऊन वाट चुकतात. काही अभ्यासक आणि शिव उपासकांच्या मते कैलासावर आजही अनेक तपस्वींचा वावर आहे. फार क्वचितप्रसंगीच हे तपस्वी नजरेस पडतात. सूर्याची पहिली किरणं पडल्यावर उजळून निघणाऱ्या या पर्वताबाबतची ही रहस्य आजपर्यंत या पर्वताइतकीच पवित्र राहिली आहेत हेच खरं.