नवी दिल्ली : टिप टिप बरसा पानी हे गाणं ऐकेकाळी खूप जास्त गाजलं होतं. आजही या गाण्यावर अनेकांचे पाय थिरकतात. चक्क एका खासदाराला ह्या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. या खासदाराने जबरदस्त डान्स केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची तुफान चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या संसदेच्या खासदाराचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. टीव्ही होस्ट आणि खासदार आमिर लियाकत हुसैन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी टिप टिप बरसा पानीवर जबरदस्त डान्स केला आहे. अनेकांनी यावर खूप टीका केली आहे. चाहते नाराजही झाले आहेत. 


दीड लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यामध्ये दिलखुलासपणे खासदार डान्स करताना दिसत आहे. तीन हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. अनेक युझर्सनी त्यांच्या डान्सचं कौतुकही केलं आहे. 


पाकिस्तानच्या संसदेते खासदार असल्याचं वाटत नाही असंही म्हटलं आहे. याआधी त्यांचा नागीण डान्स व्हायरल झाला होता. त्यांच्या डान्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या डान्समुळे खासदाराची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे.