मुंबई : Mumbai Power Outage : मुंबईतील ब्लॅकआऊटमागील चीनमधील  (China) कारस्थान उघडकीस आले आहे. अमेरिकेच्या एका एजन्सीने न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्यात म्हटले आहे की, चीन भारतात सायबरअॅटॅकच्या  (Cyberattack) तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार चीन अजूनही भारतात ब्लॅकआऊट करण्याचा कट रचत आहे. या खुलाशानंतर चीन संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तथापि, चीन अद्याप आपली चूक मान्य करण्यास तयार नाही.


चीनकडून स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या ब्लॅकआऊट (Blackout) कटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या अहवालाचे वर्णन अत्यंत बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. अनेकदा सायबरअॅटॅकच्या आरोपाखाली घेरलेल्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, “चीन सायबर सुरक्षेच्या बाजूने ठाम आहे.” चीन कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याला कडाडून विरोध करतो. पुराव्याशिवाय सायबर हल्ल्यांच्या अनुमानानुसार या आरोपांना महत्त्व नाही. पुरेसे पुरावे नसल्यास आरोप करणे बेजबाबदार आहे.



चीनचा हेतू काय आहे?


यापूर्वी, इंटरनेटच्या वापराचा अभ्यास करणार्‍या मॅसेच्युसेट्स आधारित रेकॉर्ड फ्यूचर या कंपनीने आपल्या अलिकडच्या अहवालात चीनच्या रेडको ग्रुपने (RedEcho) लक्ष्य केल्याबाबत खुलासा केला आहे. भारताच्या वीज क्षेत्राला टार्गेट केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने रविवारी रेकॉर्ड फ्यूचरवर आधारित एक बातमी प्रसिद्ध केली. सीमा प्रश्नावरुन (LAC) निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ब्लॅकआउटच्या (Mumbai Blackout) माध्यमातून चीन भारताला कोणता संदेश देऊ इच्छित आहे. चीनचा नेमका हेतू काय आहे?


सायबर सेलचा खुलासा  


हा प्रश्न इतका गंभीर आहे, कारण गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. तर जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर काही काळानंतर मुंबईत ब्लॅकआउट झाला होता. चिनने कट रचल्याचा खुलासा झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आम्ही यापूर्वी मोठ्या षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली होती. प्राथमिक तपासणी अहवालानुसार, सामूहिक ब्लॅकआउट हा सायबर हल्ल्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र सायबर सेलने एक तपासणी अहवाल सादर केला आहे ज्यामध्ये मुंबईत ग्रीड बिघाड झाल्याच्या सायबर हल्ल्याचा पुरावा सापडला आहे, देशमुख असे ते म्हणाले.