सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसतोय. जन्मदाता आईने तिचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील भयावह घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होतं. हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत 2.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. लेसी जेन असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने या व्हिडीओद्वारे तिच्या नवऱ्याचं आणि आईचं अफेअर तिला कसं कळलं याबद्दल सांगितलं आहे. 


आपल्याच लोकांनी दिला नात्याला तडा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती महिला म्हणाली की, मुलीच्या जन्माच्या वेळी तिची आई तिच्याकडे राहिला आली. ती तेव्हा तळघरात राहायची. काही महिन्यांनंतर आईन तिच्या घराजवळच एक घर भाड्याने घेतलं. तिचा नवरा आणि तिचीच आई एकत्र कामाला जायचे. 


न्यूज एयूच्या रिपोर्टनुसार, लॅसी अमेरिकेतील इंडियानापोलिसमधील रहिवासी आहे. तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं की, तिचे पती आणि आईचे जवळपास 14 वर्षांपासून अफेअर सुरु आहे. या दरम्यान या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण तिला या प्रेग्नेंसीमध्ये अनेक आरोग्याशी संबंधित आजारपणाशी झुंज द्यावी लागली होती. या दरम्यान तिला तिच्या आईवर आणि नवऱ्यावर संशय आला. 


लेसी म्हणाली की, ज्यावेळी मुलीच्या जन्माच्या वेळी आई आमच्याकडे राहिला आली होती. त्यावेळी तिने मला सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं अनेक महिलांसोबत अफेअर आहे. मात्र तू हे तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस की मी तिला हे सगळं सांगितलं आहे. पण लेसीने आईचं ऐकलं नाही, तिने नवऱ्याला या सगळ्याबद्दल विचारलं. तू माझी फसवणूक करत आहेस का? असा थेट सवाल तिने नवऱ्याला केला. त्यावेळी रागाच्या भरात तिचा नवरा म्हणाला मग तुझ्या आईला जाऊन विचार की, तिचा आणि माझ्या काय संबंध आहे ते आमचं काय नातं आहे? ज्या  विचार तुझ्या आईला.


लेसीने आईला विचारल्यानंतर तिच्या आईला घाम फुटला. तिने आईला घर सोडण्यासाठी सांगितलं असता आईन तिला अजून एक धक्का दिला. ती म्हणाली आमच्या नात्याबद्दल आजीलाही माहिती आहे. ती पुढे म्हणाली की, माझं माझ्या जावयाशी नाते आहे पण आमचं पूर्ण अफेयर आहे असं म्हणता येणार नाही. मात्र लेसीने यावर विश्वास ठेवला नाही. तिने या घटनेनंतर नवऱ्याला घटस्फोट दिला असून ती आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ करत आहे. तिने सिंगल आईंना मदत करण्यासाठी एका एनजीओची स्थापना केली आहे.