Myanmar Military Junta : म्यानमारमध्ये (Myanmar) लष्करी हुकूमशहांविरुद्ध सुरू असलेल्या जनआंदोलनाला तोंड देण्यासाठी सैन्य सतत क्रूर पद्धती अवलंबत आहेत. आता म्यानमारमध्ये लष्कराने गाव आणि शाळेवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांत 7 मुलांसह 13 लोकांची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, अनेक नागरिक जखमी आहेत. म्यानमार लष्काराने केलेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली. या हल्ल्यानंतर म्यानमारमधील जनतेवर पुन्हा एकदा दडपशाहीचा काळ वाढला आहे. (Myanmar Military Junta Attack on School)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, म्यानमारचे दुसरे सर्वात मोठं शहर मंडालेपासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेल्या तबायिनच्या लेट यट कोन गावात शुक्रवारी हा हल्ला झाला. शाळेच्या प्रशासकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमार आर्मीची चार Mi-35 हेलिकॉप्टर गावाच्या उत्तरेला फिरत होतं. त्यापैकी दोन हेलिकॉप्टर पुढे गेले. (Myanmar Military Junta)


तर 2 हेलिकॉप्टरने शाळेवर मशीन गन आणि अवजड शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांवर दोन्ही हेलिकॉप्टरने गोळीबार केला. शाळेवर हल्ला होत असल्याचे पाहून व्यवस्थापनाच्या लोकांनी विद्यार्थांना मैदानातून सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला. 


पण तोपर्यंत 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. म्यानमार लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे शाळेच्या इमारतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हे सैन्य फक्त शाळेवर गोळीबार करून थांबले नाहीत तर, शेजारच्या गावावर देखील हल्ला केला. मात्र तोपर्यंत गोळ्यांचा आवाज ऐकून गावातील लोक जंगलात पळून गेले होते. (Genocide By Myanmar Military)


दरम्यान, गावात अडकलेला 13 वर्षांचा मुलगा लष्करी हेलिकॉप्टरमध्ये (Military helicopter) बसलेल्या सैनिकांच्या निशाण्याखाली आला आणि त्यांनी त्यालाही मशीनगनने गोळीबार करून ठार केलं.