नवी दिल्ली : म्यानमारने राष्ट्राध्यक्ष विन मिंत यांनी शिक्षा माफ केल्यानंतर रोहिंग्या संकटावर वार्तांकन करणाऱ्या 2 पत्रकारांची जेलमधून सुटका केली आहे. रॉयटरच्या दोन पत्रकारांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. 500 हून अधिक दिवस यंगून जेलमध्ये ते होते. वा लोन आणि क्याव सोई ओओ अशी या दोन्ही पत्रकारांची नावं आहे. सप्टेंबर 2017 मध्ये या दोन्ही पत्रकारांना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वा लोन यांनी म्हंटलं की, 'मी पत्रकार आहे. मी माझं काम करण्यासाठी जात आहे. आता मी न्यूजरुममध्ये जाण्यासाठी जराही वाट पाहू शकत नाही.' रॉयटर्सचे संपादक स्टिफन एडलर यांनी म्यानमार सरकारच्या या निर्णय़ाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, '511 दिवसांपासून ताब्यात असलेले हे पत्रकार संपूर्ण जगासाठी माध्यमांचे प्रतिक झाले होते.'


व लोन आणि क्याव सोई उन त्या 6,250 कैद्यांपैकी आहे. ज्यांची शिक्षा राष्ट्राध्यक्ष विन मिंत यांनी माफ केली आहे. म्यानमारचे अधिकारी 17 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कैद्यांची सुटका करतात. ही म्यानमारची पंरपरा आहे.


वा लोन आणि क्याव यांना डिसेंबर 2017 मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. म्यानमारमधील रखाइनमध्ये रोहिंग्या संकटावर वार्तांकन करत असताना त्यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट्चं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्य़ामध्ये कोर्टाने त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली होती. म्यानमार सरकारच्या या निर्णयानंतर जगभरातून त्यांच्यावर टीका झाली.