India and Myanmar Border: भारताभोवती अनेक देशांच्या सीमा आहेत. भारत-पाकिस्तान (India-Pakistan border) आणि भारत चीन बॉर्डर (Indo-China border) वगळता भारताच्या उर्वरीत भागाला लागून विविध देशांच्या बॉडरवर वेगळेच चित्र पहायला मिळते. भारताच्या सीमेवर असं एक गाव आहे जे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गावात  दोन देश येतात (Two nation village). या गावातील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये (India and Myanmar Border). लोंगवा असं या गावाचं नाव आहे. हे गाव नागालँड राज्यात येते (Nagaland Longwa Village).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यात लोंगवा गाव आहे. हे गाव देशातील शेवटचे गाव म्हणूनही ओळखले जाते. निसर्गसौंदर्याने लटलेले हे गाव अतिय सुंदर आहे. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या गावाचा एक व्हिडिओ नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलँग यांनी शेअर केला आहे. 


हे गाव भारत आणि म्यानमारच्या सीमेमुळे दोन भागात विभागले आहे. यामुळेच लोंगवा गावातील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्वाचा लाभ मिळतो. या गावातील नागरीकांना दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. गावातील घरांचा काही भाग भारतात तर उर्वरित भाग म्यानमार या देशात आहे. गावातली काही मुलं भारतातील शाळेत जातात तर काही मुलं मान्यमारमधील शाळेत शिकतात. 


या गावचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे. या गावातील अनेक घरांच्या खोल्या देखील सीमेमुळे विभागल्या गेल्या आहेत. म्हणजेच अनेकांचा किचन भारतात तर बेडरुम म्यानमारमध्ये आहे. म्हणूनच तर येथील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये.


लोंगवा गावात आहे आदिवासींचा मुख्य राजा म्हणजेच 'आंग'चा राजमहाल 


लोंगवा गावच्या नागरीकांना कोण्याक म्हणतात. कोण्याक भारतातील सर्वात दुर्मिळ आदिवासी जमात आहे. 'आंग' यांचे प्रतिनीधीत्व करतो. कोण्याक लोक शत्रूच्या डोक्याच्या कवट्या गोळा करतात व त्या कवट्यांचं हार त्यांच्या गळ्यात घालतात. शत्रुला आपली ताकद दाखवण्यासाठी ते अशा प्रकारचा पोशाख करतात. जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातली ७४२ घरं ही भारतात आहेत आणि २२४ घरं म्यानमारमध्ये आहेत.आंग याचा राजमहल 100 वर्षांहून अधिक जुना आहे. गावातील इतरांप्रमाणे आंग देखील जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये. कारण, त्याच्या राजमहलाचा अर्धा भार हा म्यानमारमध्ये आहे.


आंग हाच कोण्याक जमातीचे प्रतिनीधीत्व करतो. नागरीकांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या तो सरकारपर्यंत पोहचवतो. भारताची म्यानमारसोबत आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्तच झाली.  दोन्ही देशांनी सीमारेषा उभारली तेव्हा भारत अथवा म्यानमार या दोन्ही देशांपैकी कुणीही लोंगवावर ताबा मिळवण्यासाठी दावा केला नाही. यामुळेच या गावातून सीमा जात असली तरी येथील ग्रमास्थांना या सीमेचे बंधन नाही.