सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एका फोन कॉलमुळे ४ हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी नागरिकांचा जीव वाचला, असा खुलासा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५मध्ये सौदी अरबकडून येमेनवर वारंवार बॉम्बनं हल्ले करण्यात येत होते. त्यावेळी भारतीयांना येमेनमधून बाहेर काढणं जवळपास अशक्य होतं. म्हणून मी पंतप्रधानांना सौदीच्या शाहशी बोलायला सांगितल्याचं सुषमा म्हणाल्या. मोदींनी शाहला फोन केल्यानंतर एका आठवड्यासाठी सकाळी ९ ते ११ दरम्यान बॉम्ब हल्ले थांबवण्याचा निर्णय शाहनं घेतल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगतिलं.


२०१५मध्ये 'ऑपरेशन राहत'च्या माध्यमातून भारतानं येमेनमधून ४,८०० भारतीय आणि १९७२ परदेशी नागरिकांना वाचवलं होतं. आसियान-भारत प्रवासी दिवसाचा कार्यक्रम सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुषमा स्वराज उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान बोलताना सुषमांनी हे वक्तव्य केलं आहे. सिंगापूरचे उपपंतप्रधान टियो ची हीन या कार्यक्रमाला हजर होते.


पाहा काय म्हणाल्या सुषमा स्वराज