Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. अगदी काही क्षणांच्या अंतराने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचल्याचे प्रसंग अनेक व्हिडीओंमध्ये दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला थेट शार्क माशाच्या तोंडात उडी मारता मारता वाचल्याचा थरार कैद झाला आहे.


कोण आहे ही माहिला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारी माहिला ही समुद्र संवर्धनासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञ ओशन रॅमसे आहेत. रॅमसे या त्यांच्या सोशल मीडियावरुन खास करुन इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ पोस्ट करत असतात. अनेकदा या व्हिडीओमध्ये त्यांचा शार्क माशांबरोबर झालेला संघर्ष पहायला मिळतो. शुक्रवारी रॅमसे यांच्या अशाच एका शार्क एन्काऊंटरचा व्हिडीओ ऑडली टेरिफाइंग नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. 


नेमकं घडलं काय?


या व्हिडीओमध्ये रॅमसे या डाइव्ह मारण्यासाठीचा स्कुबा डायव्हिंगचा ड्रेस परिधान करुन बोटीतून समुद्रात उडी मारण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं. त्या उडी मारणार इतक्यात त्यांना पाण्यात एक पांढऱ्या रंगाची वस्तू हलचाल करताना दिसते. लगेच रॅमसे मागे होतात. त्यानंतर पुढल्या क्षणी एक टायगर व्हाइट शार्क आपला जबडा उघडून पाण्याबाहेर डोकावतो. हा शार्क बरोबर त्याच जागेवरुन आपला जबडा वर काढताना दिसतो जिथे रॅमसे उडी मारणार होत्या. म्हणजेच रॅमसे यांनी उडी मारली असती तर त्या थेट या शार्कच्या जबड्यात सापडल्या असत्या.


..अन् मी मागे आले


"मी जेव्हा या शार्कला पाहिला तेव्हा तो माझ्या पायांच्या दिशेनेच येताना मला दिसला. मला त्याच्या वेगाचा अंदाज आल्याने मी वेळीच मागे होण्याचा निर्णय घेतला," असं रॅमसे यांनी 'टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. रॅमेस यांना क्विन निकी या टोपण नावानेही ओळखलं जातं.



आधी 2022 मध्ये पोस्ट केलेला व्हिडीओ


हा शार्क रॅमसे यांनी पायात घातलेल्या फ्लिपर्सला स्पर्श करतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हॉलिवूडमध्ये शार्कच्या हल्ल्यांवर आधारित डीप ब्ल्यू सी आणि जॉ सारख्या चित्रपटांची आठवण झाली आहे. या व्हिडीओला 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ हवाईमध्ये शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ऑक्टोबर 2022 मध्ये रॅमसे यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.


635 किलो वजन


टायगर शार्क या 14 फूटांपर्यंत लांब असू शकतात. या शार्कचं वजन 635 किलोंपर्यंत असू शकतं. त्यांच्या कल्ल्यांजवळ असलेल्या काळ्या पट्ट्यांमुळे त्यांना टायगर शार्क असं म्हणतात.