Astronaut Sunita Williams Return to Earth : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्याचदा अंतराळवारी केली आणि प्रत्येकवेळी त्यांच्या मोहिमेला यश मिळताना दिसलं. यावेळी मात्र बुच विल्मोर यांच्यासह अंतराळवारीवर गेलेल्या विलियम्स यांच्या मोहिमेत परतीच्या प्रवासावेळीच काही अडचणी आल्या आणि आठ दिवसांचा त्यांचा मुक्काम दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही अद्याप त्यांचा हा मुक्काम संपलेला नाही. त्यातच आता त्यांच्या या प्रवासासंदर्भात आणि NASA च्या मोहिमेसंदर्बातील अतिशय महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासाआधीच कॅप्स्युल थर्स्टरमध्ये बिघाड झाल्या कारणानं आता त्या नेमक्या कधी परतणार हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे. इतकंच नव्हे, तर त्यांच्या परतण्यासंदर्भात जाणकारांनी धास्तावणारी शंकाही व्यक्त केल्यामुळं अनेकांच्याच चिंतेत भर पडली आहे. माजी अमेरिकी लष्कर अवकाश प्रणाली कमांडक रुडी रिडोल्फी यांनी तीन शक्यता व्यक्य केल्या असून, विलियम्स आणि विल्मोर यांच्या परतीसंदर्भातील संभाव्य धोके अधोरेखित केले आहेत. 


'डेली मेल'च्या वृत्तानुसार रिडोल्फी यांच्या मते स्टारलायनरच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी त्याच्या सर्विस मॉड्युच्या कॅप्सुलला योग्य कोनाच्या दिशेनं ठेवणं गरजेतं आहे. यामध्ये लहानशी चूकही धोका वाढवू शकते. 


रिडोल्फी यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार स्टारलायनर व्यवस्थित अपेक्षित ठिकाणी ठेवलं गेलं नाहगी, तर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी ते पेट घेऊ शकतं किंवा अवकाशात मागच्या मागे फेकलं जाऊ शकतं. या परतीच्या प्रवासादरम्यानचे तीन धोके त्यांनी अधोरेखित केले. यामधील पहिला धोका म्हणजे चुकीच्या कोनामध्ये ठेऊनच या स्टारलायनरचा प्रवास सुरू झाला तर तो वातावरणात पुन्हा मागच्या मागे भिरकावला जाऊ शकतो. त्यावेळी स्टारलायनरमध्ये फक्त 96 तासांसाच ऑक्सिजनसाठा उपलब्ध असेल. असं झाल्यास अवकाशयात्री अंतराळातच अडकतील. 


हेसुद्धा वाचा : वय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?


 


पृथ्वीच्या वातावरणात स्टारलायनरला प्रवेश कगरता आला नाही, तरीही या दोन्ही अंतराळवीरांना तिथंच अडकून संकटांचा सामना करावा लागेल हा दुसरा धोका आणि तिसरा धोका म्हणजे हे यान पेट घेण्याचा. रिडोल्फी यांच्या मते चुकीच्या कोनावर या अंतराळयानानं परतीचा प्रवास सुरू केला तर हे यान अतिरिक्त घर्षणामुळं क्षणात पेट घेऊन त्यातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांचा तिथंच मृत्यू ओढावून त्याचं वाफेत रुपांतर होऊ शकतं. ज्यामुळं आता या परतीच्या प्रवासातील धोके पाहता प्रत्येक पाऊस नासा अतिशय सावधगिरीनं टाकताना दिसत आहे. सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीसाठी नासा आता नेमकं कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.